
परदेशी देणगी प्रकरणी NGO वर कारवाई; CBI ने 40 ठिकाणी टाकले छापे
केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने अनेक NGO आणि गृह मंत्रालयाशी संबंधित अधिकाऱ्यांना पकडण्यासाठी देशात मोठी कारवाई केली आहे. नियमांचे उल्लंघन करून एफसीआरए मंजुरी दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून या प्रकरणात हवालाद्वारे पाठवलेले 2 कोटी जप्त करण्यात आले असून डझनाहून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
माहितीनुसार, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या माहितीच्या आधारे, केंद्रीय अन्वेषण एजन्सी (सीबीआय) ने देशभरात सुमारे 40 ठिकाणी एफसीआरए कायदा प्रकरणी दिल्ली, चेन्नई, जयपूर, कोईम्बतूर म्हैसूरसह एनजीओ, मिडल मॅन आणि गृह मंत्रालयातील अधिकारी. एफसीआरएच्या कथित उल्लंघनात आणि लाच घेऊन मंजुरी देणाऱ्याना पकडण्यासाठी ही कारवाई केली आहे. यापुढेही ही कारवाई सातत्याने सुरू राहणार आहे.
हेही वाचा: राज ठाकरेंना रोखण्याचं काही कारण नाही, फडणवीसांचे भाजप खासदाराला आवाहन
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मोहीम एनजीओच्या प्रतिनिधींना, मध्यस्थांना आणि गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यांना पकडण्यासाठी सुरू करण्यात आली होती जे एफसीआरए प्रकरणांमध्ये कथितपणे गुंतलेले होते आणि अशा प्रकरणांना मंजुरी देण्याचे काम करत होते.
हेही वाचा: विलासराव असते तर, आघाडीला शिवसेनेची गरजच पडली नसती : धीरज देशमुख
Web Title: Cbi Raided At 40 Places In Crackdown On Ngo Over Foreign Donation Case
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..