
राज ठाकरेंना रोखण्याचं काही कारण नाही, फडणवीसांचे भाजप खासदाराला आवाहन
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्यावरून सध्या राजकारण तापलं आहे, उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण यांनी त्यांच्या दौऱ्याला जोरदार विरोध केला आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी राज ठाकरे यांना अयोध्येला जाऊ द्या, विरोध करण्याचं कारण नाही, असं आवाहन फडणवीसांनी भाजप खासदार ब्रिजभूषण यांनी केले आहे. (raj thackeray ayodhya visit)
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला बृजभूषण सिंग का विरोध करत आहेत, हे मला माहिती नाही. माझं याविषयी त्यांच्याशी काही बोलणं झालेलं नाही. राज ठाकरेंना विरोध करण्याचं कारण मला समजलेलं नाही. माझं स्पष्ट मत आहे, की रामाच्या शरणात जो जात असेल, त्याला जाऊ दिलं पाहिजे. रामाच्या शरणात जाण्यापासून कोणालाही रोखण्याचं, विरोध करण्याचं कारण नाही, असे फडणवीसांनी स्पष्ट सांगितले.
हेही वाचा: ''संतांपुढे नतमस्तक झाले तर, त्यात.."; राज ठाकरेंना सावंतांचा टोला
उत्तर प्रदेश सरकार मुंबईत ऑफीस उघडणार यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, मुंबई आर्थिक राजधानी आहे, सगळ्या राज्यांची भवने येथे आहेत, त्यामुळं उत्तर प्रदेशनं एखादं ऑफिस इथं काढलं तर लगेच घाबरून जाण्याची गरज नाही, मुंबई आणि माहाराष्ट्र पावरफूल आहे. त्यामुळं एखादं ऑफिस निघालं काय किंवा नाही काय काही परिणाम होणार नाही, त्यावर एकाच गोष्टीचा परिणाम होईल, ज्याप्रकारे कारागृहातून राज्यकारभार चालला आहे , याचा परिणाम निश्चितपणे महाराष्ट्रावर होईल असे देखील फडणवीस म्हणाले.
हेही वाचा: 'भाजपनं आधीच बाजी मारलेली आहे...'; चित्रा वाघ यांचं ट्विट
Web Title: Devendra Fadanvis To Bjp Mp Brijbhushan Singh Over Raj Thackeray Ayodhya Visit
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..