CBSE दहावीचा निकाल पुढे ढकलला; 'ही' आहे नवी तारीख

आधी १० जूनला निकाल लागणार असल्याची दिली होती माहिती
Exams
ExamsGoogle

मुंबई: देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही सुरू होत असल्याने CBSE च्या अंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी वेळ लागत असल्याने सीबीएसईकडून दहावीचा निकाल लांबणीवर टाकला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा निकाल लागण्यासाठी विद्यार्थ्यांना जुलै अखेरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. (CBSE 10th results postponed schools can now submit internal marks by June 30)

Exams
परमबीर सिंह यांच्याविरोधातील गुन्ह्याचा तपास आता CID कडे

CBSE कडून शाळांना अंतर्गत मूल्यमापन करून निकाल तयार करण्यासाठी आणखी 25 दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे निकाल लांबणीवर पडणार आहे. शिवाय CBSE ने एक परिपत्रक जारी करून त्यात 10 जूनला दहावीचा निकाल जाहीर होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळेच आपल्या शाळांना अंतर्गत मूल्यमापन करून त्यासाठीचा निकाल तयार करून तो वेबसाईटवर अपलोड करण्यासाठी 25 दिवसांचा अतिरिक्त वेळ दिला आहे.

Exams
दादरमध्ये मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई

आता शाळा 30 जूनपर्यंत CBSE कडूनकडे निकाल पाठवू शकतात. त्यानंतरच निकाल जाहीर केला होणार आहे. शाळांना निकाल पाठविल्यानंतर बोर्डाकडून तो जाहीर होण्यास 5 ते 7 दिवसांचा वेळ लागू शकतो. त्यामुळे निकाल जाहीर होण्यास जुलै उजाडणार असल्याने विद्यार्थ्यांना तो पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

(संपादन- विराज भागवत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com