esakal | परमबीर सिंह यांच्याविरोधातील गुन्ह्याचा तपास आता CID कडे
sakal

बोलून बातमी शोधा

parambir-singh.jpg

परमबीर सिंह यांच्याविरोधातील गुन्ह्याचा तपास आता CID कडे

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई: पोलिस निरीक्षक बी. आर. घाडगे यांच्या तक्रारीवरून कल्याण येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात वरिष्ठ अधिकारी परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्यासह इतर व्यक्ती व अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) वर्ग करण्यात आला आहे. अ‍ॅट्रोसिटीसह (Atrocity) गंभीर कलमांतर्गत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबाबत बुधवारी घाडगे यांना CID ने नवी मुंबईतील कार्यालयात बोलावले आहे. (CID to Investigate Parambir Singh Case Atrocity Corruption)

हेही वाचा: Video: मोठं झाड कोसळताना महिलेने पाहिलं अन्...

पोलीस निरीक्षक बी.आर. घाडगे यांनी पोलिस महासंचालक कार्यालयाला लेखी पत्र लिहून परमबीर सिंह यांच्याविरोधात बेकायदा कृत्य व भ्रष्टाचार करून कोट्यवधी रुपये कमवल्याचा आरोप केला होता. 14 पानी या पत्राची प्रत मुख्यमंत्री, गृहमंत्री, महासंचालक कार्यालय व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक यांना पाठवण्यात आली होती. या पत्रात घाडगे यांनी परमबीर सिंह ठाण्याचे पोलिस आयुक्त असताना श्रीमंत व्यक्तींची नावे विविध गुन्ह्यातून काढण्यासाठी बेकायदेशीररित्या आदेश दिल्याचा आरोप केला होता.

हेही वाचा: दादरमध्ये मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई

गैरव्यवहाराच्या एका प्रकरणातून 22 सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे काढण्याचे आदेश घाडगे यांना सिंह यांनी दिले होते. त्यांनी तो आदेश मानला नाही, त्यामुळे त्यांच्यावर चार खोटे गुन्हे दाखल करून त्यांना निलंबीत करण्यात आल्याचेही पत्रात घाडगे यांनी म्हटले होते. त्यावेळी घाडगे तत्कालीन सहपोलिस आयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणाचा तपास करत होते. त्यांनी याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश घाडगे यांना दिले होते. पण सिंह यांनी कल्याण व डोंबिवली महानगर पालिकेतील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 22 जणांची नावे मागे घेण्यास सांगितले. या पत्रात घाडगे यांनी अनेक गंभीर आरोप सिंह यांच्यावर केले होतो.

हेही वाचा: मराठा आरक्षण: "भाजपच्या नेत्यांनी PM मोदींना भेटावे"

या प्रकरणी घाडगे यांच्या फिर्यादीवरून अकोला येथे गुन्हा दाखल करून तो ठाण्यातील बाजारपेठ पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता. या गुन्ह्यात आरोपींची संख्या व तपासाचा आवाका पाहता मोठे संख्याबळाची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने हा गुन्हा वर्ग करण्याबाबत ठाणे पोलिसांकडून कळवण्यात आल्याचे समजतेय. त्यानुसार याप्रकरणी अखेर CID कडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे सोनू जालन प्रकरणासह आता घाडगे यांच्या तक्रारीप्रकरणी CID तपास करणार आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास CBI कडे देण्यात यावा, यासाठी परमबीर सिंग यांनी यापूर्वीच रीट पिटीशन दाखल केली होती.

(संपादन- विराज भागवत)