CBSE बारावीच्या परीक्षा रद्द; PM मोदींच्या बैठकीत निर्णय

केंद्रीय शिक्षा मंत्रालय आणि सीबीएसई बोर्डचे अधिकारी तसेच काही केंद्रीय मंत्री या बैठकीला उपस्थित होते.
CBSE Students
CBSE Studentsfile photo
Updated on
Summary

केंद्रीय शिक्षा मंत्रालय आणि सीबीएसई बोर्डचे अधिकारी तसेच काही केंद्रीय मंत्री या बैठकीला उपस्थित होते.

नवी दिल्ली : CBSE १२ वी बोर्ड परीक्षा घ्यायच्या की नाही, यावरून गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी बैठक बोलावली होती. या बैठकीत परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य आणि तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांच्या आधारे आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य डोळ्यासमोर ठेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. गुणांचे मूल्यमापन कसे करणार? याबाबत सीबीएसईने अद्याप माहिती दिली नाही, पण त्याच्या निकषांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. (CBSE Board Class XII examinations cancelled in meeting held by PM Modi)

CBSE Students
देशात लशींच्या मिक्सिंगला अद्याप परवानगी नाही; सरकारचं स्पष्टीकरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्वाची आहे. कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांवरील ताण वाढविणे योग्य ठरणार नाही.' याआधी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी बोर्डाच्या परीक्षांबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते. पण अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांनी एम्समध्ये भरती करण्यात आले.

सर्व राज्यांचे पंतप्रधान मोदींच्या बैठकीकडे लक्ष लागले होते. दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर बारावीच्या परीक्षा रद्द होणार का याचीच चर्चा सुरू होती. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतची बैठक बोलावली होती. त्यामुळे राज्य शिक्षण मंडळही सीबीएसई बोर्ड काय निर्णय घेणार याचीच वाट पाहात होते. सीबीएसईच्या निर्णयानंतर राज्य सरकार आता आपापल्या बोर्डाच्या १२वीच्या परीक्षांबाबत निर्णय घ्यायला मोकळे झाले आहे. त्यामुळे राज्यातील बारावीच्या परीक्षांबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

CBSE Students
होय! अधिकतर प्रोडक्ट्स 'अनहेल्दी'; मॅगी बनवणाऱ्या कंपनीने केलं मान्य

सीबीएसई बोर्डाचे अध्यक्ष, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, प्रकाश जावडेकर, गृहमंत्री अमित शहा, पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, केंद्रीय शिक्षा मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) व ‘कौन्सिल फॉर दि इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन’ (CISSA) यांच्या प्रस्तावित इयत्ता बारावीच्या परीक्षांबाबतचा अंतिम निर्णय आज जाहीर होणार होता. पूर्ण परीक्षाच रद्द करण्याऐवजी अर्ध्या किंवा दीड तासाची परीक्षा घ्यावी याबाबत केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे या परीक्षा रद्द कराव्या, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती.

देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Premium Ingredients: The Royal Touch of Desi Ghee, Fresh Green Peas, and Aromatic Spices
Why did India waive cotton import duty?
Latest Marathi News Live Update
IMD monsoon delay forecast for India 2026
Marathi News Esakal
www.esakal.com