'ब्रेक अप'मुळे अभ्यासात मन लागत नाही...

वृत्तसंस्था
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

विद्यार्थ्यांनी अनेक समस्या समुपदेशकांकडे खुलेपणाने मांडल्या आहेत. "माझे नुकतेच ब्रेक-अप झाले असून अभ्यासात मन लागत नाही. मी तिच्याशिवाय अन्य कशाचाही विचार करू शकत नाही,' अशी समस्या बारावीच्या विद्यार्थ्याने सांगिल्याची माहिती दिल्लीतील एका समुपदेशकाने दिली

नवी दिल्ली - परीक्षेच्या काळात मनात येणारे नकारात्मक विचार, वाढते मानसिक दडपण यातून विद्यार्थ्यांना बाहेर काढून ताणविरहित वातावरणात परीक्षेला सामोरे जाण्यासाठी शिक्षण मंडळांतर्फे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवेचे आयोजन केले जाते. यंदा केंद्रीय परीक्षा मंडळाने (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन- सीबीएसई) टोल फ्री हेल्पलाईन देशभरात खुली केली. तिला प्रचंड प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी प्रश्‍नांचा अक्षरशः भडीमार केला आहे. मात्र यात केवळ अभ्यासाच्या ताणासंबंधीच्या समस्या नसून "ब्रेक-अप', पालकांकडून वाईट वागणूक मिळणे, लक्षात न राहणे आदी साखगी समस्याही विद्यार्थ्यांनी मांडल्या आहेत.

विद्यार्थ्यांनी अनेक समस्या समुपदेशकांकडे खुलेपणाने मांडल्या आहेत. "माझे नुकतेच ब्रेक-अप झाले असून अभ्यासात मन लागत नाही. मी तिच्याशिवाय अन्य कशाचाही विचार करू शकत नाही,' अशी समस्या बारावीच्या विद्यार्थ्याने सांगिल्याची माहिती दिल्लीतील एका समुपदेशकाने दिली. अभ्यासामुळे येणारा ताण कमी व्हावा यासाठी परीक्षेच्या तयारीच्या काळात आणि परीक्षा सुरू असतानाही विद्यार्थ्यांचे मानसिक समुपदेशन करण्याचा निर्णयकेंद्रीय परीक्षा मंडळाने जानेवारीत जाहीर केला होता.

"सीबीएसई'ची मान्यता असलेल्या सरकारी व खासगी शाळांचे मुख्याध्यापक व प्रशिक्षित समपदेशक, काही मानसशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ज्ञ अशा 91 जणांनी हेल्पलाईनवरील समुपदेशन कार्यक्रमात भाग घेऊन परीक्षेसंबंधी मानसिक समस्यांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 91पैकी 71 तज्ज्ञ भारतात उपलब्ध होते तर 20 जण विदेशात होते.

Web Title: cbse india students education