"सीबीएसई'चा दहावीचा निकाल आज होणार जाहीर 

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 मे 2018

"सीबीएसई'च्या (cbseresults.nic.in) किंवा (cbse.nic.in) या संकेतस्थळावर हा निकाल प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. काल ता.28 याबाबत शिक्षण सचिव अनील स्वरूप यांनी ट्‌विटरवर घोषणा केली होती. "सीबीएसई''कडून घेण्यात आलेल्या 2017-18 साठीच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 29 मे रोजी दुपारी चार वाजता जाहीर करण्यात येणार आहे,'' असे ट्‌विट अनिल स्वरूप यांनी केले होते. 

"सीबीएसई'च्या (cbseresults.nic.in) किंवा (cbse.nic.in) या संकेतस्थळावर हा निकाल प्रसिद्ध करण्यात येणार आहे. "सीबीएसई'कडून पाच मार्च ते चार एप्रिल दरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला एकूण 16 लाख 38 हजार विद्यार्थी बसले होते. 

"सीबीएसई'च्या निकालासाठी विद्यार्थ्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. संसदेचे संयुक्त सचिव संदिप मित्तल आणि शिक्षण सचिव अनिल स्वरुप यांनी विद्यार्थ्यांना ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: CBSE Result will be declred today