CBSE Letter to Schools : सीबीएसई शाळांमध्ये मिळणार आता भारतीय भाषांचाही पर्याय; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

सीबीएसईने याबाबत आपल्या सर्व शाळांना पत्र पाठवले आहे.
CBSE Letter to Schools
CBSE Letter to SchoolseSakal

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या, म्हणजेच सीबीएसईच्या शाळांमध्ये आता भारतीय भाषांमध्ये शिक्षण मिळणार आहे. आतापर्यंत या शाळांमध्ये केवळ इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिलं जात होतं. मात्र आता इतर भाषांचा पर्याय देखील देण्याचा विचार करावा असं पत्र सीबीएसईने आपल्या सर्व शाळांना पाठवले आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सीबीएसईने उचललेलं या पावलाचं स्वागत केलं आहे. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून सीबीएसईला यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (CBSE letter to schools)

"CBSE च्या सर्व शाळांमध्ये बालवाडी ते बारावीपर्यंत भारतीय भाषांमध्ये शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करून देण्याबद्दल मी सीबीएसईचे अभिनंदन करतो. न्यू एज्युकेशन पॉलिसीचे व्हिजनही शाळांमध्ये भारतीय भाषा-आधारित शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचे आहे. शिक्षणातून चांगले परिणाम दिसून येण्यासाठी ही एक उत्तम सुरुवात आहे." अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे.

सीबीएसईचे एज्युकेशन डिरेक्टर जोसेफ इमॅन्युएल यांनी शाळांना याबाबत पत्र लिहिलं आहे. आपल्या पत्रात ते म्हणतात, की "बहुभाषिक माध्यमातून शिक्षण देण्यासाठी काही आव्हाने येऊ शकतात, मात्र त्यावर मात करणं शक्य आहे. वरील आव्हाने लक्षात घेता, भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. संबंधित भाषेतील शिक्षकांची उपलब्धता, बहुभाषिक पाठ्यपुस्तके, कालमर्यादा ही मुख्य आव्हाने आहेत."

CBSE Letter to Schools
CBSE : ‘सीबीएसई’ला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार; केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान

"हे व्हिजन प्रत्यक्षात उतरवण्यासाठी शाळा उपलब्ध संसाधने शोधू शकतात, क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकतात आणि इतर शाळांशी सहयोग देखील करू शकतात." असंही ते आपल्या पत्रात म्हणाले.

सीबीएसईने असंही म्हटलं, की "NCERT ने बहुभाषांमध्ये शिक्षण उपलब्ध करण्याच्या गंभीर कार्याला सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे. जेणेकरून पुढच्या सत्रापासूनच सर्व विद्यार्थ्यांना २२ अनुसूचित भाषांमध्ये पाठ्यपुस्तकं उपलब्ध केली जाऊ शकतील."

CBSE Letter to Schools
Medical Diploma : विद्यार्थ्यांना फेलोशिप आणि डिप्लोमा पदवी देणारे 26 अभ्यासक्रम रद्द; MEDD ची मोठी कारवाई

उच्च शिक्षण प्राधिकारणाने आता अनेक भाषांमध्ये शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे, तसेच विविध भाषांमध्ये परीक्षा घेतल्या जात आहेत. तांत्रिक, वैद्यकीय, व्यावसायिक, कौशल्य, कायद्याचे शिक्षण इत्यादींची पाठ्यपुस्तके आता भारतीय भाषांमध्ये उपलब्ध होत आहेत. त्यामुळेच शाळांमध्ये बहुभाषिक शिक्षणाचा पाया तयार करणं महत्त्वाचं आहे, असंही सीबीएसईने म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com