इस्रायली दुतावासाबाहेरील स्फोटातील संशयितांचे फुटेज जाहीर

इस्रायली दुतावासाबाहेरील स्फोटातील संशयितांचे फुटेज जाहीर

नवी दिल्ली : जानेवारी महिन्यामध्ये दिल्लीमधील इस्रायल दुतावासाजवळ स्फोट झाला होता. राष्ट्रीत तपास यंत्रणेने आज मंगळवारी या स्फोटामागील संशयित आरोपींना दाखवणारे सीसीटीव्ही फुटेज जाहिर केले आहेत.

इस्रायली दुतावासाबाहेरील स्फोटातील संशयितांचे फुटेज जाहीर
अण्वस्त्र सज्जतेत भारत पाकिस्तानच्या मागे; रशियाकडे सर्वाधिक शस्त्रे

या आरोपींची माहिती देणाऱ्यांना 10 लाखांचे बक्षिस सुद्धा जाहिर करण्यात आले आहेत. ज्या दिवशी हा स्फोट झाला त्या दिवशी हे संशयित आरोपी त्या भागाच्या आसपास संशयास्पद रित्या फिरताना आढळून आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एपीजे अब्दुल कलाम रोड, जिंदाल हाऊसजवळ, सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जवळपास उभ्या असलेल्या तीन वाहनांच्या खिडकीच्या काचा फुटण्याव्यतिरिक्त इतर कोणालाही दुखापत झाली नाही किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दुतावासाबाहेर एक लिफाफा आणि पत्र सापडले असून त्यावर गंभीर इशारा देण्यात आला होता. हा तर केवळ ट्रेलर होता, खरा पिक्चर अजून बाकी आहे. कासिम सुलेमानीच्या हत्येचा बदला घेण्यात येईल, असा संदेश पत्रात लिहिण्यात आला होता. त्यामुळे यामागे आंतरराष्ट्रीय कट असून इराण याचा सूत्रधार असण्याची शंका व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर या प्रकरणात मोसादनेही एन्ट्री घेतली होती. दिल्लीत इस्त्रायलच्या दुतावासाबाहेर झालेला बॉम्बस्फोट छोट्या स्वरुपाचा असला तरी त्यामागे एखाद्या मोठ्या कटाची शक्यता वर्तवली जात होती. जैश उल हिंद नावाच्या एका अनोळखी दहशतवादी संघटनेने या आयईडी स्फोटाची जबाबदारी घेतली आहे. परंतु, सुरक्षा संस्थांकडून अजून याचा तपास सुरु आहे. स्फोटाच्या ठिकाणी मिळालेल्या पत्रानुसार काही संकेत मिळत आहेत. या पत्रात या सौम्य स्वरुपाच्या स्फोटाला ट्रेलर असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी 2012 मध्ये इस्त्रायली दुतावासाच्या वाहनाला लक्ष्य केले होते. यावेळी चौकशीत इराणी संस्थेचा हात असल्याचे समोर आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com