CAA : पोलिसांकडूनच मोडतोड; सीसीटीव्ही व्हिडिओच्या फुटेजमधून बाब उघड

वृत्तसेवा
बुधवार, 25 डिसेंबर 2019

उत्तर प्रदेशात नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनादरम्यान पोलिसांनीच सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करीत मोडतोड केल्याचे व्हिडिओ समोर आल्याने खळबळ निर्माण झाली आहे. हातात काठ्या घेतलेले हेल्मेटधारी पोलिस मुझफ्फरनगरच्या मध्यवर्ती भागामध्ये मोडतोड करीत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.

मुझफ्फरनगर : उत्तर प्रदेशात नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनादरम्यान पोलिसांनीच सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करीत मोडतोड केल्याचे व्हिडिओ समोर आल्याने खळबळ निर्माण झाली आहे. हातात काठ्या घेतलेले हेल्मेटधारी पोलिस मुझफ्फरनगरच्या मध्यवर्ती भागामध्ये मोडतोड करीत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, उत्तर प्रदेशात नागरिकत्वविरोधात विविध ठिकाणांवर झालेल्या आंदोलनामध्ये वीस लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी कानपूरमध्ये झालेल्या गोळीबाराच्या मुद्द्यावरूनही उत्तर प्रदेश पोलिस तोंडघशी पडले होते. 

अटलजींचा 25 फूट उंचीचा अष्टधातूंचा पुतळा; एवढा आला खर्च 

पोलिसांनी गोळीबाराचा दावा फेटाळून लावल्यानंतर प्रत्यक्षात व्हिडिओमध्ये मात्र पोलिस गोळीबार करीत असल्याचे दिसून आले होते. याआधीही उत्तर प्रदेशच्या पोलिस महासंचालकांनी या आंदोलनादरम्यान पोलिसांनी एकही गोळी झाडली नव्हती, असा दावा केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CCTV Footage Shows Police Vandalism in Muzaffarnagar