Vadodara Boat Incident: बोट सफारीसाठी रांगेत उभे होते विद्यार्थी, त्यांना कल्पनाही नव्हती.. वडोदऱ्यातील दुर्घटनेपूर्वीचा व्हिडिओ समोर

Vadodara Boat Capsize Incident: गुजरातमधील वडोदरा येथील हरणी तलावात गुरुवारी एक बोट उलटल्याने १४ जणांचा मृत्यू झाला आहे. 27 विद्यार्थ्यांचा गट त्यांच्या शिक्षकांसह सहलीला गेला असताना ही घटना घडली आहे. या घटनेचा video समोर आला आहे.
Vadodara Boat Capsize Incident
Vadodara Boat Capsize IncidentEsakal

गुजरातमधील वडोदरा येथील हरणी तलावात गुरुवारी एक बोट उलटल्याने १४ जणांचा मृत्यू झाला आहे. 27 विद्यार्थ्यांचा गट त्यांच्या शिक्षकांसह सहलीला गेला असताना ही घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेच्या एका दिवसानंतर सोशल मीडियावर या दुर्घटनेचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये न्यू सनराईज स्कूलचे विद्यार्थी बोटीच्या प्रवासासाठी रांगेत उभे असल्याचे दिसत आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या व्हिडीओनुसार, विद्यार्थी एका रांगेत उभे राहून बोट चालवण्याची वाट पाहत होते. प्राथमिक वृत्तानुसार, विद्यार्थी आणि शिक्षक दुपारी 4.30 च्या सुमारास पिकनिकसाठी तलावावर पोहोचले आणि एका बोटीवर चढले, जी ओव्हरलोडमुळे उलटली. हरणी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, 'या दुर्घटनेत १४ मुले आणि दोन शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. ज्या विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आलं त्या विद्यार्थ्यावर एसएसजी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (The video before the accident in Vadodara)

Vadodara Boat Capsize Incident
Vadodara Boat Capsize Incident: 12 विद्यार्थी आणि 2 शिक्षकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी 18 जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची एक्स-ग्रॅशिया रक्कम जाहीर केली. तसेच जखमींना 50 हजार रुपये देण्याची घोषणा केली. पीएम मोदींनी ट्विट करत म्हटलं की, 'वडोदराच्या हरणी तलावात बोट उलटल्यामुळे झालेल्या जीवितहानीमुळे मी दु:खी आहे. या दु:खाच्या प्रसंगी माझी संवेदना शोकाकुल कुटुंबियांसोबत आहे. जखमी लवकर बरे होवोत. स्थानिक प्रशासन बाधित लोकांना शक्य ती सर्व मदत करत आहे'.

Vadodara Boat Capsize Incident
Vadodara Boat Capsized: वडोदऱ्यात मोठी दुर्घटना! नाव पलटल्यानं 10 विद्यार्थ्यांसह 15 जणांचा मृत्यू

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, 'गुजरातमधील वडोदरा येथे बोट दुर्घटनेत मुले आणि शिक्षकांच्या मृत्यूची बातमी अतिशय दुःखद आहे. शोकाकुल कुटुंबातील सदस्यांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करते.'' दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीही मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये आणि जखमींना लाख, ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

१८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

या घटनेनंतर १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोघांना अटक केली. उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी ९ पथके तयार करण्यात आली आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.

Vadodara Boat Capsize Incident
Vadodara Boat Capsized: नाव दुर्घटनेतील मृतांना अन् जखमींना PM मोदी अन् CM पटेल यांच्याकडून मदत जाहीर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com