नव्या प्रकारच्या युद्धाबद्दल CDS बिपिन रावत यांनी केलं सावध

नव्या प्रकारच्या युद्धाबद्दल CDS बिपिन रावत यांनी केलं सावध
Summary

एका कार्यक्रमात बोलताना रावत म्हणाले की, आणखी एक समस्या इथं समोर आणू इच्छितो, ती म्हणजे नव्या प्रकारचं युद्ध.

कोरोनाच्या संकटात सध्या ओमिक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरिअंटने चिंता वाढवली आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) बिपिन रावत (Bipin Rawat) यांनी एकमेकांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. एका कार्यक्रमात बोलताना रावत म्हणाले की, आणखी एक समस्या इथं समोर आणू इच्छितो, ती म्हणजे नव्या प्रकारचं युद्ध. जैविक युद्ध जर झालं तर आपल्याला एकत्र येऊन कृती करण्याची गरज आहे. तसंच आपली ताकद अशी वाढवायला हवी की व्हायरस आणि आजारामुळे कोणता परिणाम देशावर होणार नाही असंही सीडीएस बिपिन रावत यांनी म्हटलं.

नव्या प्रकारच्या युद्धाबद्दल CDS बिपिन रावत यांनी केलं सावध
गुजरात सरकारने आणले पेंग्विन; आता bjp काय बोलणार? - महापौर पेडणेकर

रावत असेही म्हणाले की, देशात अनेक संकटं आली आहेत. यात काही नैसर्गिक तर काही मानवनिर्मित आहेत. मात्र सर्व संकटांपेक्षा व्हायरसची साथ सर्वांसमोर आव्हान बनून राहिली आहे. आपल्याला एकत्रितपणे याच्याशी लढा देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com