सीडीएस बिपीन रावत यांचे 'ते' स्वप्न अपूर्णच

बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचं पार्थिव गुरुवारी दिल्लीमध्ये आणले जाणार आहे.
Bipin Rawat
Bipin RawatGoogle

नवी दिल्ली : तामिळनाडुतील कुन्नुर (Helicopter Crash in Kunnur ) भागात वायुसेनच्या हेलिकॉप्टरला झालेल्या भीषण अपघातात सीडीएस बिपीन रावत (CDS Bipin Rawat Dies In Accident) यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला. यात बिपीन रावत यांच्या पत्नी आणि सेनेच्या इतर अधिकाऱ्यांचा समावेश होता. दरम्यान, सीडीएस बिपीन रावत यांच्या अचानक जाण्याने त्यांची एक इच्छा अपुरीच राहणार आहे, अशी माहिती रावत यांच्या काकांनी दिली आहे.

Bipin Rawat
'आयुष्य किती क्षणभंगूर'; CDS रावत यांच्या निधनावर सेलिब्रिटींकडून शोक व्यक्त

सीडीएस बिपीन रावत यांचे काका निवृत्त हवालदार भरतसिंह रावत (CDS Bipin Rawat Uncle ) हे उत्तराखंडमधील सायना (Ciyna Village In Uttarakhand) या त्यांच्या मुळ गावी राहतात. ते म्हणाले की, बिपीन रावत यांना त्यांच्या वडिलोपार्जिक जमिनीवर (CDS Bipin Rawat Wants to build home at his native place) घर बांधण्याचे स्वप्न होते. मात्र, आता त्यांचे हे स्वप्न अधुरेच राहणार आहे.

गावात आहेत तीन घरे

सायना गावात केवळ जनरल रावत यांच्या काकांचेच कुटुंबीय राहते. तर इतर दोन घरे रिकामीच आहेत. जनरल रावत ज्यावेळी लष्करप्रमुख झाले होते त्यानंतर एप्रिल 2018 मध्ये ते शेवटचे गावात आल्याचे रावत यांच्या काकांनी सांगितले. त्यावेळी जनरल रावत यांनी त्यांच्या वडिलोपार्जित असणाऱ्या जमिनीवर घर बांधण्याची इच्छा बोलून दाखविली होती. तसेच निवृत्त झाल्यानंतर गावातील शांत वातावरणात त्यांना रहायचे होते. मात्र, बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात जनरल रावत यांचे निधन झाल्याने आता रावत यांची ही इच्छा कायमचीच अधुरी राहिली आहे.

Bipin Rawat
''तैवान लष्कर प्रमुख आणि बिपीन रावत यांची हेलिकॉप्टर दुर्घटना समान''

उद्या होणार अंत्यसंस्कार

बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचं पार्थिव गुरुवारी सायंकाळपर्यंत एका सैन्यदलाच्या विमानानं राजधानी दिल्लीमध्ये आणलं जाईल. त्यानंतर शुक्रवारी सकाळी रावत आणि त्यांच्या पत्नीचं पार्थिव त्यांच्या घरी नेण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत अंत्यदर्शानासाठी वेळ देण्यात येईल. यानंतर कामराज मार्गावरुन दिल्ली छावणीतील बराड स्मशानभूमीपर्यंत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येईल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com