''तैवान लष्कर प्रमुख आणि बिपीन रावत यांची हेलिकॉप्टर दुर्घटना समान''

Bipin Rawat Chopper Crashes in Tamil Nadu
Bipin Rawat Chopper Crashes in Tamil NaduSakal

नवी दिल्ली : भारताचे CDS जनरल बिपीन रावत (bipin rawat) यांचे बुधवारी हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाले. त्यांची पत्नी, हवाई दलाचे चार अधिकाऱ्यांसह सात लष्करी अधिकाऱ्यांचे या अपघातात निधन झाले. पण तुम्हाला माहित आहे का? तैवानचे लष्कर प्रमुख (taiwan army chief) शेन यी-मिंग आणि दोन प्रमुख जनरल यांच्यासह सात जणांचा देखील गेल्या वर्षी अशाच प्रमाणे हेलिकॉप्टर अपघातात (helicopter crash) मृत्यू झाला होता. ही घटना आणि आजची रावत यांच्या हेलिकॉप्टरची घटना समान आहे. संरक्षण विषयातील तज्ज्ञ ब्रह्मा चेलानी (bramha chelani) यांनी यावर भाष्य केले आहे.

तैवान लष्कर प्रमुख आणि बिपीन रावत यांची हेलिकॉप्टर दुर्घटना समान

''एकीकडे चीनसोबत गेल्या काही महिन्यांपासून सीमेवर तणाव आहे. हिमालयात युद्धाची परिस्थिती आहे. अशा बिकट परिस्थितीतच रावत यांचा अपघाती मृत्यू होणे यापेक्षा वाईट वेळ असूच शकत नाही'' असे चेलानी यांनी म्हटले आहे. याचबरोबर चेलानी यांनी रावत यांच्या या अपघाताचा गेल्या वर्षी तैवानच्या एका विमान अपघाताशी जोडला आहे. चेलानी यांनी यासबंधी ट्विट केले आहेत.

"तैवानचे लष्कर प्रमुख शेन यी-मिंग आणि दोन प्रमुख जनरल यांच्यासह सात जणांचा गेल्या वर्षी हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. ही घटना आणि आजची रावत यांच्या हेलिकॉप्टरची घटना समान आहे. प्रत्येक हेलिकॉप्टर दुर्घटनेत चीनविरोधी आक्रमक असलेल्या प्रत्येक प्रमुख लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू होतो", असे चेलानी यांनी म्हटले आहे.

या दुर्घटनेनंतर हवाई दलाने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत."या विचित्र समानतेचा असा अर्थ नाहीय की दोन्ही हेलिकॉप्टर दुर्घटनांमध्ये काही परस्पर संबंध असेल किंवा कोणत्या बाहेरील शक्तीचा हात असेल. प्रत्येक अपघाताने महत्वाचे अंतर्गत प्रश्न उपस्थित केले आहेत. विशेषत: प्रमुख जनरल अधिकाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरच्या मेन्टेनन्सबाबत. रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताचे कारण शोधण्याची गरज आहे, असे चेलानी म्हणाले."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com