

Gyanesh Kumar
esakal
मुख्य निवडणूक आयुक्त असलेल्या ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. एका २० वर्षे जुन्या प्रकरणी केरळच्या गृहमंत्र्यांनी हे आदेश दिले असल्याची माहिती समोर येत आहे.केरळचे गृहमंत्री रमेश चेन्निथला यांनी ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात भ्रष्टाचार आणि कथित गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी विजिलन्स चौकशीचे आदेश दिलेत. हे प्रकरण २००६ मधील असून ज्ञानेश कुमार तेव्हा केरळ सरकारच्या लोक निर्माण विभागाचे (PWD) सचिव म्हणून कार्यरत होते.