मिशन मंगलचा शो सुरु असताना चित्रपटगृहाचे कोसळले छत

मिशन मंगलचा शो सुरु असताना चित्रपटगृहाचे कोसळले छत

मुंबई : अक्षय कुमारची भूमिका असलेल्या मिशन मंगल या चित्रपटाचा शो सुरु असताना छप्पर पडून दोनजण जखमी झाले आहेत. डोंबिवलीतील मधुबन चित्रपटगृहामध्ये ही घटना घडली आहे. चित्रपटगृहाचे छप्पर खाली पडले आणि त्यामध्ये एक महिला आणि लहान मुलगी जखमी झाली आहे.

चित्रपटाचा शेवट सुरु असतानाच अचानक चित्रपटगृहाचे छप्पर कोसळले. या दुर्घटनेमध्ये नंदिनी गणपुले ही महिला तर हिमानी झोपे ही लहान मुलगी जखमी झाली असून हिमानीच्या डाव्या पायाला आणि हाताला किरकोळ जखम झाली आहे. तर, नंदिनी यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.

मधुबन चित्रपटगृहाची डागडुजी करण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र, प्रशासनाने त्याकडे पूर्णपणे दूर्लक्ष केलं. आता या दूर्घटनेनंतर चित्रपटगृहाची तातडीने दुरुस्ती करणार असल्याचे चित्रपटगृह प्रशासनाने सांगितलं आहे. दरम्यान, दूर्घटनेनंतर चित्रपटगृहाच्या प्रशासनाने दोन्ही जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com