
अमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचा शपथविधी बुधवारी झाला. यादरम्यान तमिळनाडूतील कमला हॅरिस यांच्या मूळगावी तुलासेंतीरापूरम पेन्गनाडू येथे दिवसभर उत्साहाचे वातावरण होते.
चेन्नई - अमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचा शपथविधी बुधवारी झाला. यादरम्यान तमिळनाडूतील कमला हॅरिस यांच्या मूळगावी तुलासेंतीरापूरम पेन्गनाडू येथे दिवसभर उत्साहाचे वातावरण होते.
भारत-अमेरिका मैत्रीचं नवं पर्व; PM मोदींचा US राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना खास संदेश!
कमला हॅरिस यांची आई श्यामला गोपालन यांचा जन्म चेन्नईत झाला होता. पीएच.डी करण्यासाठी त्या १९ व्या वर्षी अमेरिकेत स्थलांतरित झाल्या होत्या. तिरुवरुर जिल्ह्यातील तुलासेंतीरापूरम पेन्गनाडू हे हॅरिस यांचे मूळ गाव आहे. तिथे त्यांच्या आईकडचे अनेक नातेवाईक आहेत. उपाध्यक्षपदी हॅरिस विराजमान झाल्याने गावात उत्साही वातावरण आहे. आज सकाळी दहा वाजल्यापासूच तेथे आनंद साजरा करण्यास सुरुवात झाली. गावातील श्री धर्मसंस्था मंदिरात विशेष पूजा व हवन करण्यात आले. त्यानंतर फटाके फोडण्यात आले व लाडू वाटप झाले. हॅरिस यांच्या अभिनंदनाचे फलकही लावले होते, असे सरपंच जे. सूतकर यांनी सांगितले.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
मंदिराच्या भिंतीवर कोरीवकाम करण्यासाठी कमला हॅरिस यांच्या भारतातील नातेवाइकांनी २०१४ मध्ये देणगी दिली होती. त्यावरील फलकावर हॅरिस यांचे नाव लिहिलेले असून पाच हजार रुपयांची देणगीचा उल्लेख करण्यात आला आहे. हॅरिस यांच्या आजोळचे नातेवाईक डॉ. सरला गोपालन आणि डॉ. गोपालन बालचंद्रन म्हणाले, ‘‘हॅरिस यांच्याशी बोलणे झाले नाही, पण शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत.’
Edited By - Prashant Patil