
लस निर्यात करण्यास ‘सीरम’ला केंद्राची मनाई
नवी दिल्ली - देशातील (India) अनेक राज्यांमध्ये (State) कोरोना प्रतिबंधक लशीचा तुटवडा (Lack of corona preventive vaccine) लक्षात घेऊन केंद्र सरकारने (Central Government) ब्रिटनला (Briton) ५० लाख डोस (Dose) निर्यात (Export) करण्यास पुण्यातील ‘सीरम इन्स्टिट्यूट’ला (Serum Institute) मनाई (Oppose) केली आहे. हे डोस आता देशातील लसीकरणासाठी (Vaccination) उलपब्ध होऊ शकतील.
ब्रिटनला कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा शब्द दिला होता, त्यानुसार निर्यात करण्याची परवानगी द्यावी, असे ‘सीरम’चे म्हणणे होते. परंतु देशातील कोरोनाचा हाहाकार आणि देशतील लसीची गरज याचा विचार करून केंद्र सरकारने ही परवानगी नाकारली आहे. देशातील नागरिकांच्या जीव वाचविण्यास प्राधान्य असल्याचे नमूद करीत केंद्राने लस निर्यातीला मनाई केल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. लशीच्या निर्यातीला मनाई केल्याचे सरकारने अधिकृतपणे जाहीर केलेले नाही. मात्र, सीरमशी संपर्क करून साधून लस उपलब्ध करून घेण्याच्या सूचना आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना देण्यात आल्या आहेत. ‘सीरम’कडील ५० लाख डोस आता १८ ते ४४ या वयोगटातील लसीकरणासाठी उपलब्ध होतील. खासगी रुग्णालये देखील या कंपनीकडून थेट खरेदी करू शकतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
हेही वाचा: उत्तराखंडमध्ये पुन्हा ढगफुटी; देवप्रयागमधील घरे, दुकाने गेली वाहून
राज्यांच्या तक्रारी
कोरोना प्रतिबंधक लशीच्या तुटवड्यासंबंधी अनेक राज्ये आता तक्रार करू लागले आहेत. लशींच्या उपलब्धतेअभावी लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ राज्यांवर आली आहे. दिल्ली सरकारनेही यासंबंधी केंद्राला इशारा दिला आहे. दिल्ली सरकारने केंद्राकडे १ कोटी ३४ लाख डोस मागितले होते. परंतु केंद्राने केवळ साडेतीन लाख डोस दिल्याचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी स्पष्ट केले आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील लसीकरण शिबीर लस उपलब्ध नसल्याने रद्द करण्यात आले आहे. महाराष्ट्रातही लसीचा तुटवडा आहे. पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी होत आहे. परंतु केंद्र सरकारकडून पुरेशा प्रमाणात लसीचे डोस उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण बंद ठेवावे लागत आहे. कोव्हॅक्सिन लसीचा जास्त तुटवडा असल्याचे सांगितले जात आहे.
Web Title: Center Bans Serum For Export Of
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..