esakal | संभाव्य लाटेला तोंड देण्यास केंद्र सज्जICorona
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Patients

संभाव्य लाटेला तोंड देण्यास केंद्र सज्ज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्याशक्यतेच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही अरिष्टास सामोरे जाण्यास केंद्र सरकार पूर्ण सज्ज असल्याचे सांगण्यात आले. एका दिवसात पाच लाख रुग्णांवर उपचार करण्यासाठीच्या पायाभूत सुविधा सरकारने सज्ज ठेवल्या आहेत, असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी आज सांगितले.

हेही वाचा: के.व्ही.सुब्रमण्यम मुख्य आर्थिक सल्लागार पदाचा देणार राजीनामा

दरम्यान, पाच लाख याच आकड्यावर लक्ष देऊ नका, भविष्यात कधीही एका दिवसात देशात इतके प्रचंड संख्येने कोविड रुग्ण येतील किंवा यावेत असा त्याचा अर्थ नाही असेही डॉ. पॉल यांनी स्पष्ट केले. सणासुदीच्या दिवसात लोकांचे नियमबाह्य वर्तन व बाजारपेठांत वाढणारी गर्दी पाहता कोरोनाची रुग्णसंख्या आगामी काळात पुन्हा उसळी घेईल अशी शंका व्यक्त होत आहे. त्याच वेळी लसीकरणानेही वेग घेतल्याने कोरोनाची तिसरी लाट येऊच नये अशी आरोग्य यंत्रणेची इच्छा आहे. दुर्दैवाने तसे झाले तर, यंत्रणेची तयारी काय आहे, याची माहिती डॉ. पॉल यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘राज्यांकडून आलेल्या अहवालांनुसार संक्रमित रुग्णांसाठी देशात सध्या ८ लाख ३६ हजार खाटा उपलब्ध आहेत. संक्रमित रुग्णांची संख्या एखादा अपवाद वगळता सातत्याने घटत आहे. राज्यांनी दुसऱ्या लाटेदरम्यान व त्यानंतर केलेले कौतुकास्पद काम यासाठी कारणीभूत आहे. मात्र केंद्रीय यंत्रणेने धोका पत्करायचा नाही असे ठामपणे ठरविले आहे.’’

सर्व जिल्ह्यांत ऑक्सिजन प्रकल्प

दुसऱ्या लाटेत देशभरात ऑक्सिजनची भीषण टंचाई निर्माण झाली होती. त्यानंतर देशभरात ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यास केंद्राने गती दिली. पीएम केअर्स फंड व अन्य माध्यमांतून रुग्णालयांच्या परिसरात ऑक्सिजन प्लांट उभे राहू लागले. डॉ. पॉल यांच्या माहितीनुसार सध्या १२०० ऑक्सिजन प्रकल्प देशात कार्यरत झाले आहेत. देशात ऑक्सिजन प्रकल्प नसलेला एकही जिल्हा नाही, असाही दावा त्यांनी केला.

loading image
go to top