केंद्राने चार लाख कोटी राज्यांना समान वाटावेत; ममतांची मागणी

केंद्राने दिवाळीच्या पूर्वसंध्येला पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्यानंतर पश्चिम बंगाल सरकारने मूल्यवर्धित कर (व्हॅट) रद्द करावा या मागणीवरून भाजपने बंगालमध्ये आंदोलन छेडले आहे.
Mamta Banerjee
Mamta BanerjeeSakal

कोलकता - अलीकडच्या काळात इंधनाच्या वाढीव दरांमुळे केंद्र सरकारला चार लाख कोटी रुपये मिळाले आहेत, असा दावा करून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ही रक्कम राज्यांना समान प्रमाणात वाटण्यात यावी अशी मागणी केली.

केंद्राने दिवाळीच्या पूर्वसंध्येला पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्यानंतर पश्चिम बंगाल सरकारने मूल्यवर्धित कर (व्हॅट) रद्द करावा या मागणीवरून भाजपने बंगालमध्ये आंदोलन छेडले आहे. कोलकत्यात सोमवारी आंदोलनाच्या पहिल्या दिवशी पोलिसांनी शेकडो भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

Mamta Banerjee
जम्मू काश्मीर: सुरक्षा यंत्रणा अ‍ॅक्शन मोडमध्ये; CRPF च्या 5 तुकड्या रवाना

या पार्श्वभूमीवर विधानसभेच्या अधिवेशनात ममता यांनी उलटवार केला. पाच राज्यांमधील विधानसभेच्या आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवूनच केंद्राने अबकारी कर कमी केला. आता राज्यांनी व्हॅट कमी करावा अशी भाजपची अपेक्षा आहे, असा दावा करून, ममता यांनी, असे केले तर मग राज्यांना त्यांचा पैसा कुठून मिळणार, असा सवाल उपस्थित केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com