esakal | केंद्राने इतर देशांना लशी दिल्या; अरविंद केजरीवाल यांनी केला आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

Arvind Kejriwal

केंद्राने इतर देशांना लशी दिल्या; अरविंद केजरीवाल यांनी केला आरोप

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील कोरोना (Corona) प्रतिबंधक लशींच्या (Vaccine) तुटवड्यावरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी थेट केंद्र सरकारलाच (Central Government) लक्ष्य (Target) केले आहे. जगभरातील अनेक देश त्यांच्या नागरिकांच्या लसीकरणाचा (Vaccination) प्राधान्याने विचार करीत असताना केंद्र सरकारने मात्र इतर देशांना लस पुरविल्याची टीका त्यांनी केली. ‘स्पुटनिक-व्ही’ या लसीच्या उत्पादक कंपनीने दिल्लीस लस पुरविण्याची तयारी दर्शविल्याचे त्यांनी सांगितले. (Center vaccinated other countries Allegations made by Arvind Kejriwal)

हेही वाचा: ESakal Survey : मोदी सरकारबद्दल करा तुमची 'मन की बात'

केंद्र सरकारने लसीकरणाची मोहीम सहा महिने उशिराने सुरू केली. तसेच राज्यांनी त्यांच्याच पातळीवर लस खरेदी करावी, अशी जबाबदारीही त्यांच्यावर टाकली. अनेक राज्यांनी जागतिक निविदा काढून लस मिळविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात त्यांना अपयश आले. आपल्याला कोरोना विरोधातील लढाईत पराभूत होता येणार नाही. ही लढाई केवळ भाजप हारणार नाही तर देशाला त्याचे परिणाम भोगावे लागली, अशी टीका केजरीवाल केली. प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री हा कोरोना विरोधात लढण्यासाठी केंद्र सरकारला पाठबळ देण्यास तयार आहे, असेही त्यांनी सांगितले. राजधानी दिल्लीत कायमस्वरूपी लॉकडाउन ठेवता येणार नाही. व्यवहार टप्प्याटप्याने सुरळीत करावे लागतील. त्यासाठी लसीकरण युद्धपातळीवर करावे लागेल. म्हणूनच अनेक देशांबरोबर राजधानीला लस उपलब्ध करून देण्याबाबत बोलणी सुरू असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.

हेही वाचा: "मोदी सरकारने उत्तर कोरियालाही टाकलं मागे"

मॉडर्ना, फायझरच्या लशी खरेदी करा

दिल्लीमध्ये केंद्र सरकारने लोकांना थेट वाहनांमध्येच लस द्यायला सुरूवात केली आहे. स्पुटनिक- व्ही या लसनिर्माता कंपनीने दिल्ली सरकारला डोस पुरवठा करण्याची तयारी दर्शविली असली तरीसुद्धा नेमके किती डोस मिळणार? हे अद्याप ठरलेले नाही, अशी स्पष्टोक्ती केजरीवाल यांनी दिली. मॉडर्ना आणि फायझरच्या लशी लहान मुलांसाठी अनुकूल आहेत, केंद्र सरकारने त्या खरेदी कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.