केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

वृत्तसंस्था
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

नवी दिल्लीः केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने आज (बुधवार) घेतला. ही वाढ 1 जुलै 2018 पासून लागू होणार आहे.

केंद्र सरकारी कर्मचाऱयांना सात टक्के महागाई भत्ता मिळत असून, आता तो नऊ टक्क्यांवर पोहोचला आहे. केंद्र सरकारी कर्मचारी व निवृत्तीवेतन धारकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. महागाई भत्त्यात वाढ केल्याचा सुमारे 48.21 लाख कर्मचारी आणि 62.03 लाख निवृत्तीवेतनधारकांना लाभ मिळणार आहे. महागाई भत्तावाढीमुळे सरकारी तिजोरीवर वर्षाला 6 हजार 112 कोटी रुपयांचा भार पडणार आहे.

दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत केंद्रीय कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Web Title: centeral governments gift to central employees cabinet increases da by 2 percent