Central Government: केंद्र सरकारने दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. दिव्यांग श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या परिवहन भत्त्यात वाढ करणार असल्याचं सरकारने जाहीर केलं आहे. त्यामुळे परिवहन भत्ता डबल होणार आहे. वित्त मंत्रालयाने याबाबत सर्व मंत्रालयाना आणि विभागाना निर्देश दिले आहेत. वित्त मंत्रालयाने निवेदन जारी करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. ही सुधारणा १५ सप्टेंबर २०२२ रोजी सूचनांमध्ये करण्यात आली आहे.