
Government announces Diwali relief for central employees and pensioners with added salary and allowance benefits.
esakal
Central Government Employees Diwali Relief Announcement : केंद्र सरकारकडून दिवाळीच्या आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना एक दिलासादायक बातमी मिळू शकते. असं मानलं जात आहे की, महागाई भत्त्यात(DA) ३ टक्के वाढ आणि महागाई मदत(DR)ची लवकरच घोषणा केली जाऊ शकते. ही वाढ जुलै २०२५पासून लागू मानली जाईल आणि ऑक्टोबरचे वेतन किंवा पेन्शनमध्ये मागील तीन महिन्यांचा एरियरही मिळू शकतो.
सरकार वर्षांत दोनवेळा DAमध्ये सुधारणा करते. पहिली सुधारणा होळीच्या आधी(जानेवारी-जूनसाठी) आणि दुसरी दिवळीच्या आधी(जुलै-डिसेंबरसाठी)या वर्षी दिवाळी २०-२१ ऑक्टोबरला आहे आणि मानलं जात आहे की, ही वाढ ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात घोषित केली जाऊ शकते. मागील वर्षी देखील सरकारने दिवळीच्या जवळपास दोन आठवडे आधी १६ ऑक्टोबर रोजी DA वाढीची घोषणा केली होती.
नव्या वाढीनंतर DA ५५ टक्क्यांहून वाढून ५८ टक्के होईल. हा बदल जुलै २०२५ पासून लागू होईल आणि तीन महिन्यांचा एरियर ऑक्टोबरच्या सॅलरीत एकत्रित मिळेल. सातव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत DAचे मोजमाप एका ठराविक सूत्रानुसार होते. यामध्ये मागील बारा महिन्याचे CPI-IWची सरासरी घेतली जाते. जुलै २०२४ ते जून २०२५ पर्यंतची सरासरी १४३.६ आली, ज्या आधारे नवीन DA ५८ टक्के निघाला.
जर एखाद्या कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी १८ हजार रुपये आहे, तर ५५ टक्के DAवर त्याला ९ हजार ९०० रुपये मिळत होते. आता ५८ टक्के DAवर ही रक्कम १० हजार ४४० रुपये होईल. म्हणजेच प्रत्येक महिन्यास ५४० रुपये जास्त. अशाचप्रकारे जर एखाद्या पेन्शनर्सची बेसिक पेन्शन २० हजार रुपये आङे, तर त्याला जवळपास ६०० रुपये अतिरिक्त मिळतील. ही सातव्या वेतन आयोगातील शेवटची DAवाढ असेल. या वेतनआयोगाचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२५ रोजी समाप्त होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.