esakal | कोरोनाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये ३१ मार्चपर्यंत वाढ; देशात संसर्गाचा वाढता आलेख कायम!

बोलून बातमी शोधा

corona}

केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना याबाबत पत्र लिहिले आहे. 

कोरोनाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये ३१ मार्चपर्यंत वाढ; देशात संसर्गाचा वाढता आलेख कायम!
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

देशभरात कोरोनाच्या संसर्गानं पुन्हा एकदा वेग घेतला असून परिस्थितीने पुन्हा उग्र रुप धारण करु नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये ३१ मार्चपर्यंत वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना याबाबत पत्र लिहिले आहे. 

लशीसाठी हवी ऑनलाइन नोंदणी

गृहसचिव भल्ला यांनी राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं, "या महामारीला पूर्णपणे संपवण्यासाठी सावधगिरी आणि कडक निगराणी करणं आवश्यक आहे. गृहमंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या एसओपीजचे पालन करताना सर्व व्यवहारांना परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर शेजारील देशांच्या सीमेवरील व्यापारासाठी व्यक्ती आणि वस्तूंना कोणताही प्रतिबंध घालण्यात आलेला नाही. 

संसर्ग रोखण्यासाठी सावधगिरी आणि कडक निरिक्षण गरजेचं

भल्ला म्हणाले, "ज्या प्रकारे आपण जाणता की देशात सक्रीय आणि नव्या प्रकरणांच्या संख्येत गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. मात्र, महामारीला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी सावधगिरी आणि कडक निरिक्षण कायम ठेवणं गरजेचं आहे." 

श्रीलंकेचा चीनच्या कोरोना लशीवर नाही विश्वास, भारतीय लशीला दिली पसंती

महाराष्ट्रात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात  सातत्याने कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. यासाठी राज्य सरकार देखील सतर्क आहे. बाहेरून राज्यात येणाऱ्या लोकांना कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचं प्रमाणपत्र सोबत बाळगण्याचा निर्देश दिले आहेत. जगात भारत संक्रमितांच्या संख्येत दुसऱ्या क्रमांकावर आहे तर अमेरिका पहिल्या. याच्याशी लढण्यासाठी अमेरिकेसह भारतात लसीकरण मोहिम सुरु असून जनतेला लस टोचून घेण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.