esakal | श्रीलंकेचा चीनच्या कोरोना लशीवर नाही विश्वास, भारतीय लशीला दिली पसंती

बोलून बातमी शोधा

corona vaccine.jpg

चिनी लशीवर शंका जाहीर करणारा श्रीलंका एकमेव देश नाही. यापूर्वी, ब्राझीलनेही असे केलेले आहे.

श्रीलंकेचा चीनच्या कोरोना लशीवर नाही विश्वास, भारतीय लशीला दिली पसंती
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

कोलंबो- कोरोना विषाणूची सुरुवात चीनमध्ये झाल्याचा आरोप जगातील अनेक देशांनी केला आहे. चीननेही या विषाणूचा खात्मा करण्यासाठी लस तयार केली आहे. परंतु, या चिनी लशीवर जगातील बहुतांश देशांचा विश्वास नसल्याचे दिसून येत आहे. आता श्रीलंकेला चीनची कोरोना लस सिनोफार्मवर विश्वास नाही. श्रीलंकेने चिनी लस न घेता भारतीय लस वापरण्याचा निर्णय घेतला आहे. 

श्रीलंकेने म्हटले आहे की, त्यांनी चिनी लस खरेदी करणे सध्या स्थगित केले आहे. भारतात उत्पादित झालेली ऑक्सफोर्ड आणि अ‍ॅस्ट्राझेनकाच्या लशीचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्रीलंकेचे कॅबिनेट प्रवक्ते डॉ. रमेश पथिराना म्हणाले की, चिनी लस सिनोफार्माच्या तिसऱ्या टप्प्याची चाचणी अद्याप पूर्ण झालेली नाही. सिनोफार्मा लशीच्या नोंदणीचे कागदपत्रेही आम्हाला मिळालेले नाहीत. त्यामुळे सध्या आम्ही त्या लस घेणे स्थगित केले आहे. 

हेही वाचा- ममतांना उत्तर देण्यासाठी इराणी मैदानात; यात्रेदरम्यान स्कूटीवरुन प्रवास

WHO ची मंजुरी नाही
डॉ. पथिराना पुढे म्हणाले की, श्रीलंका सीरम इन्स्टि्टयूटमध्ये तयार झालेल्या अ‍ॅस्ट्राजेनकाच्या लशीवर अवलंबून असेल. जेव्हा चिनी कंपनीकडून आवश्यक कागदपत्रे मिळतील. त्यानंतर त्यावर विचार केला जाईल. परंतु, त्यांनी सिनोफार्म लशीच्या नोंदणीला वेळ लागेल. कारण जागतिक आरोग्य संघटनेनेही त्यांना अद्याप मंजुरी दिलेली नसल्याचे सांगितले. 

रशियन लस स्पुतनिकलाही अद्याप मंजुरी मिळाली नसल्याचे डॉ. पथिराना म्हणाले. त्यामुळे श्रीलंका आपल्या 14 मिलियन नागरिकांसाठी भारताकडून निर्मित लशीवर अवलंबून असल्याचे त्यांनी म्हटले. स्थानिक माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, श्रीलंकन कॅबिनेटने 'मेड इन इंडिया' लशीचे 10 मिलियन डोस खरेदी करण्यासाठी 52.5 मिलियन डॉलरचा करार केला आहे. 

हेही वाचा- मोदी-शहांच्या सोयीनुसार वेळापत्रक ठरवलंय का? निवडणुक आयोगावर ममता कडाडल्या

ब्राझीलनेही व्यक्त केली शंका
दरम्यान, चिनी लशीवर शंका जाहीर करणारा श्रीलंका एकमेव देश नाही. यापूर्वी, ब्राझीलनेही असे केलेले आहे. ब्राझीलने मागील महिन्यात सिनोवॅक लस फायझर-बायोटेक आणि मॉर्डेनाकडून विकसित लशीच्या तुलनेत कमी प्रभावी असल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर ब्राझीलच्या लेट स्टेज ट्रायलमध्ये चिनी लशीची प्रभावकारिता 50.38 टक्केच आढळून आली होती.