केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारली

Narendra Modi
Narendra ModiSakal
Updated on

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी (Republic Day) दिल्लीतील राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ (Maharashtra Tableau) सहभागी होणार होता. त्यासाठी जैवविविधतेची मानके या विषयावर आधारित चित्ररथ तयार करण्यात आला होता. मात्र, केंद्र सरकारने या चित्ररथाला परवानगी नाकारण्यात आली. सुरक्षेच्या कारणावरून ही परवानगी नाकारल्याचे समजते.

Narendra Modi
प्रजासत्ताक दिनासाठी चित्ररथ वगळला; भडकलेल्या ममतांचं PM मोदींना पत्र

केंद्र सरकारने एक दिवसापूर्वी पश्चिम बंगालच्या रथाला देखील परवानगी नाकारली होती. त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. तसेच त्यांना पत्र देखील पाठवले होते. ममता यांनी आपल्या पत्रात, केंद्र सरकारच्या अशा वागण्यामुळे लोकांना धक्का बसला आहे. देशाला 75 वर्ष पूर्ण होत असताना देशातील स्वातंत्र्य सेनानींच्या योगदानावर आधारित चित्ररथाला जागा न मिळणे हे संतापजनक आहे, असं त्यांनी पत्रात म्हटलं होतं. आता पश्चिम बंगालपाठोपाठ केरळ, बिहार आणि महाराष्ट्राच्या चित्ररथाला देखील परवानगी नाकारण्यात आली आहे.

प्रजासत्ताक दिनी राजपथा होणाऱ्या संचलात प्रत्येक राज्याच्या संस्कृतीचे प्रतिक असणारे चित्ररथ सहभागी होत असतात. यामध्ये विविध राज्यांच्या चित्ररथांना ठराविक निकषांनुसार संधी दिली जाते. यंदाच्या प्रजासत्ताकदिनी दिल्लीत होणाऱ्या संचलनात 'महाराष्ट्रातील जैवविविधता मानके' या विषयावर आधारित चित्ररथ सहभागी होणार होता. मात्र, संरक्षण मंत्रालयाने यंदा परवानगी नाकारल्याने या चित्ररथाचे संचालन प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why did India waive cotton import duty?
Latest Marathi News Live Update
IMD monsoon delay forecast for India 2026
Mamata Banerjee reaction on Abhishek Banerjee attack
Marathi News Esakal
www.esakal.com