
नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal chief minister Mamata Banerjee ) यांनी आज रविवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Modi) पत्र लिहलंय. प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी पश्चिम बंगालच्या प्रस्तावित चित्ररथाला वगळण्यात आल्याच्या निर्णयावर ममता मोदींवर भडकल्या आहेत. या निर्णयाचा मोदींनी पुनर्विचार करावा, अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे मोदींकडे केली आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात पश्चिम बंगालच्या चित्ररथाचा समावेश न केल्याबद्दल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती केली आहे. तसेच या निर्णयामुळे अतीव दुःख झाल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. पश्चिम बंगाल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनीही या प्रकाराबद्दल संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांना पत्र लिहिले आहे.
देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाची रचना केंद्र सरकारने केली आहे. यावर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५वी जयंती आहे. त्यामुळे पश्चिम बंगालने त्याचाच संदर्भ घेऊन चित्ररथ तयार केला होता. ‘‘प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात पश्चिम बंगालच्या चित्ररथाचा समावेश न करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे मला धक्का बसला आहे, तसेच अतीव दुःख झाले आहे. कोणतेही कारण न देता चित्ररथ नाकारण्यात आला हे जास्त धक्कादायक आहे,’’ असे ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या दोन पानी पत्रात लिहिले आहे.
राज्याच्या चित्ररथ नेताजी सुभाषचंद्र बोस आणि ‘आयएनए’ या संकल्पनेवर आधारित होता, असेही ममता यांनी म्हटले आहे.
‘‘केंद्र सरकारच्या वृत्तीमुळे पश्चिम बंगालमधील नागरिकांना दुःख झाले आहे. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना प्रजासत्ताक दिनी या भूमातेच्या सुपुत्रांनी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेतली जात नाही हे अनपेक्षित आहे. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करावा अशी आग्रही विनंती मी आपल्याला करते,’’ असेही ममता बॅनर्जी यांनी पत्रात म्हटले आहे.
पुनरावृत्ती टाळण्यासाठी निर्णय?
केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनासाठी ‘आझादी का अमृत महोत्सव’ अशी संकल्पना ठेवली आहे. केंद्राची संकल्पना आणि पश्चिम बंगालच्या चित्ररथाची संकल्पना ही सारखीच होती. त्यामुळे पुनरावृत्ती टाळण्यासाठी पश्चिम बंगालच्या चित्ररथाला परवानगी नाकारण्यात आल्याचे समजते. मात्र सरकारकडून अधिकृतपणे त्याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.