

New Insurance Amendment Bill 2025
ESakal
संसदेने विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक (FDI) सध्याच्या ७४ टक्क्यांवरून १०० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे विधेयक मंजूर केले. ज्यामुळे विम्याचा प्रवेश वाढेल. प्रीमियम कमी होईल आणि रोजगार निर्मितीला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. लोकसभेत मंजूर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, सबका बिमा सबकी रक्षा (विमा कायद्यांमध्ये सुधारणा) विधेयक, २०२५ राज्यसभेने आवाजी मतदानाने मंजूर केले. विधेयकात विरोधी पक्षाने केलेल्या अनेक सुधारणा सभागृहाने नाकारल्या. ज्यामध्ये पुढील छाननीसाठी हा कायदा संसदीय समितीकडे पाठविण्याचा समावेश होता.