esakal | रेमडेसिव्हिर स्वस्त होणार; आयात शुल्क हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

बोलून बातमी शोधा

Remdesivir Injection

रेमडेसिव्हिर तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सामग्रीवरील आयात शुल्क हटविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

रेमडेसिव्हिर स्वस्त होणार; आयात शुल्क हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
sakal_logo
By
वृत्तसंस्था

Corona Update: नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं धुमाकूळ घातला आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. या दरम्यानच अँटी व्हायरल असलेल्या रेमडेसिव्हिर (Remdesivir) या इंजेक्शनचा वापर रुग्णांवर उपचार करण्यासाठी होऊ लागला. परिणामी रेमडेसिव्हिरला अफाट मागणी वाढली. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: जॉर्ज फ्लॉइड हत्या प्रकरणी पोलिस दोषी

रेमडेसिव्हिर तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सामग्रीवरील आयात शुल्क हटविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे रेमडेसिव्हिरची कमतरता आणि किंमतही कमी होणार आहे. रेमडेसिव्हिरसाठी आवश्यक कच्चा माल आणि अँटी व्हायरल ड्रग्ज बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इतर घटकांवरील सीमाशुल्कही माफ करण्यात आले आहे. महसूल विभागाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने ज्या वस्तूंवरील शुल्क माफ केले आहे, त्यामध्ये रेमडेसिव्हिरच्या निर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य (API), इंजेक्शन आणि बीटा साइक्लोडोडेक्स्ट्रिन यांचा समावेश आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत आयात शुल्कात सूट देण्यात येणार आहे.

हेही वाचा: अग्रलेख : लसीकरणाला बूस्टर डोस!

केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी याबाबतचं ट्विट केलं आहे. कोरोना उपचारात प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालावर कोणतेही आयात शुल्क आकारले जाणार नाही. तसेच रेमडेसिव्हिर इंजेक्शनची आयातही पूर्णपणे शुल्कमुक्त करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशात पुरेशा प्रमाणात औषधाचा साठा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा: एक अमेरिकी महिला आणि नाझी स्पाय नेटवर्क

दुसरीकडे केंद्रीय मंत्री मनसुख मंडावीया म्हणाले की, येत्या १५ दिवसात अँटी-व्हायरल ड्रग रिमिडिसीव्हरचे उत्पादन दुप्पट केले जाईल. रेमेडेसिव्हिरसंदर्भात बर्‍याच राज्यात तुटवडा भासत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या इंजेक्शनचे उत्पादन वाढविण्यासाठी आणि ते कमी खर्चात उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकार सर्व प्रयत्न करत आहे. सध्या, रेमडेसिव्हिरच्या दीड लाख इंजेक्शनाचे उत्पादन केले जात आहे. पुढील १५ दिवसात हे उत्पादन दुपटीने वाढवण्यात येणार आहे.