RSS मुख्यालयच्या सुरक्षेची जबाबदारी CISFकडे; 150 सुरक्षा कर्मचारी तैनात

Central Industrial Security Force has taken over security cover of RSS headquarters from sept 1 2022
Central Industrial Security Force has taken over security cover of RSS headquarters from sept 1 2022

नागपूर : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) ने 1 सप्टेंबर 2022 पासून RSS मुख्यालयाची सुरक्षा हाती घेतली आहे. एका अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) तुकडीने नागपूरच्या महाल परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या हेडगेवार भवनाची सुरक्षा ताब्यात घेतली. संघटनेतील एका सूत्राने सांगितले की, सीआयएसएफ आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना 'झेड प्लस सुरक्षा कवच' देखील देईल.

काल संध्याकाळी आलेल्या अधिकार्‍यांसह सुमारे 150 सुरक्षा कर्मचार्‍यांनी राज्य राखीव पोलिस दल (SRPF) आणि नागपूर पोलिसांची जागा घेतली, हे गेल्या 15 वर्षांपासून संघाच्या मुख्यालयाला सुरक्षा पुरवत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली . केंद्रीय गृह मंत्रालयाने याआधी RSS मुख्यालय आणि मोहन भागवत यांना असलेल्या धोक्याच्या पार्श्वभूमिवर Z+ सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय घेतला होता.

Central Industrial Security Force has taken over security cover of RSS headquarters from sept 1 2022
Teachers Day : ज्यांनी 250 वर्षे राज्य केलं, आज ते मागे पडलेत - PM मोदी

संघ मुख्यालयाची सुरक्षा ताब्यात घेतलेल्या सीआयएसएफ टीमचे नेतृत्व उपायुक्त दर्जाचा अधिकारी करतील. फिल्हार मुख्यालयाजवळील एका शाळेत सुरक्षा कर्मचार्‍यांची सोय करण्यात आली आहे. जून 2006 मध्ये, लष्कर-ए-तैयबाच्या तीन संशयित दहशतवाद्यांनी आरएसएसच्या मुख्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना पोलिसांनी गोळ्या घालून ठार केले होते.

Central Industrial Security Force has taken over security cover of RSS headquarters from sept 1 2022
Pune : रायसोनी कॉलेजच्या मयूर पाटीलला ॲमेझॉनकडून 45 लाखांचं पॅकेज!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com