
संसदेची नवी इमारत त्रिकोणी आकाराची असून भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षापर्यंत म्हणजेच २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. बांधकामाच्या जागेवर खोदकामास सुरुवात झाली आहे.
नवी दिल्ली - केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘सेंट्रल व्हिस्टा’चे बांधकाम शुक्रवारी सुरू झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ महिनाभरापूर्वी पार पडला होता.
संसदेची नवी इमारत त्रिकोणी आकाराची असून भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षापर्यंत म्हणजेच २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. बांधकामाच्या जागेवर खोदकामास सुरुवात झाली आहे. इमारत वेळेत पूर्ण होण्यासाठी पुरेसे मजूर काम करत आहेत, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्याने दिली.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टाटा प्रोजेक्टस लि.कडून बांधल्या जाणाऱ्या या इमारतीसाठी ९७१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. इमारतीच्या बांधकामाला ३५ दिवस विलंबाने सुरुवात झाली असली तरी, बांधकाम वेळेवर पूर्ण करण्याची ग्वाही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. या ३५ दिवसांमध्ये बाह्य भागातील दगड, कारपेट आदींची खरेदी करण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. या आठवड्यातच वारसा समितीच्या १४ सदस्यीय पथकानेही संसदेच्या नव्या इमारतीला मंजुरी दिली होती.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
‘सेंट्रल व्हिस्टा’ च्या बांधकामाचा आमचा कृती आराखडा यापूर्वीच तयार झाला आहे. कुशल मनुष्यबळासारख्या स्त्रोतांत वाढ करून इमारतीच्या बांधकामाला गती दिली जाईल.
- संदीप नवलाखे, उपाध्यक्ष, टाटा प्रोजेक्टस लि.