राज्यांना Amphotericin- B इंजेक्शन्सचा अतिरिक्त पुरवठा

राज्यांना Amphotericin- B इंजेक्शन्सचा अतिरिक्त पुरवठा
Summary

केंद्राने जाहीर केलेल्या यादीनुसार, सर्वाधिक गुजरातला 4 हजार 640 इंजेक्शन तर त्याखालोखाल महाराष्ट्राला 4 हजार 60 इंजेक्शन मिळाली आहेत.

नवी दिल्ली - देशात कोरोनानंतर (Covid 19) होणाऱ्या म्युकरमायकोसिसचा (Mucormycosis) प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्याच्यावर उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या एम्फोटेरिसीन बी (Amphotericin- B) या औषधाचे वितरण राज्यांना करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री डीव्ही सदानंद गौडा यांनी राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांसह केंद्रीय संस्थांसाठी एम्फोटेरिसीन बी च्या अतिरिक्त पुरवठ्याची घोषणा केली. याआधी 21 मे रोजी देशभरात एम्फोटेरिसीन बी औषधाची 23 हजार 680 इंजेक्शन देण्यात आली होती. आता अतिरिक्त 19 हजार 420 इजेक्शन दिली आहेत. कोणत्या राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना किती इंजेक्शन दिली याची यादी केंद्रीय मंत्र्यांनी शेअर केली आहे.

केंद्राने जाहीर केलेल्या यादीनुसार, सर्वाधिक गुजरातला 4 हजार 640 इंजेक्शन तर त्याखालोखाल महाराष्ट्राला 4 हजार 60 इंजेक्शन मिळाली आहेत. याशिवाय आंध्र प्रदेशला 1840 तर राजस्थानला 1430 आणि उत्तर प्रदेशला 1260 इंजेक्शन देण्यात आली आहेत.

राज्यांना Amphotericin- B इंजेक्शन्सचा अतिरिक्त पुरवठा
सुशील कुमारकडून पद्मश्री पुरस्कार परत घेणार?

म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार असून सामान्यपणे माती, झाडे, फळांमध्ये ही बुरशी आढळते. एम्फोटेरिसीन बी हे अँटि फंगल ड्रग म्हणून या आजारावर वापरण्यात येतं. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्युकरमायकोसिसचा साथीच्या आजारांमध्ये समावेश केला आहे. यामुळे आता राज्यांना म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची नोंद करणं आणि त्याचा अहवाल केंद्राकडे पाठवणं बंधनकारक आहे. देशात राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, कर्नाटक, ओडिशा, तेलंगणा आणि तामिळनाडुने म्युकरमायकोसिसला साथरोग घोषित केलं आहे. अनेक राज्यांमध्ये याचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com