सावरकरांच्या भारतरत्नवरून केंद्राचा खुलासा; औपचारिक शिफारशीची गरज नाही

टीम ई-सकाळ
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्यावर आज केंद्र सरकारने संसदेत उत्तर दिले आहे.

नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याचा विषय सध्या चर्चेत आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने या विषयी आश्वासन दिले होते. आज, हा विषय संसदेतच चर्चेत आला. त्यावर सरकारने आपली भूमिका मांडली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी सकाळचे एप डाऊनलोड करा

काँग्रेस नेत्यांनी घेतली सोनिय गांधीेंची भेट; सरकार स्थापनेवर चर्चा

काय आहे गृहमंत्रालयाचे म्हणणे?
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्यावर आज केंद्र सरकारने संसदेत उत्तर दिले आहे.  या संदर्भात लोकसभेत उपस्थित करण्यात आलेल्या एका प्रश्नावर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून उत्तर देण्यात आले. सभागृहात देण्यात आलेल्या माहितीमध्ये सावरकर यांना भारतरत्न देण्यात येणार की नाही, यावर स्पष्टता दिली नाही. पण, भारतरत्न सन्मान देण्यासाठी वेगवेगळ्या घटकांकडून आपल्याला शिफारसी येत राहतात. परंतु, त्यासाठी कोणत्याही औपचारिक शिफारशीची गरज असत नाही. भारतरत्न देण्याविषयी त्या त्या वेळी निर्णय घेतले जातात, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

पवारांना मजून घ्यायला 100 जन्म घ्यावे लागतील : संजय राऊत

भाजपचे आश्वासन
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याचे आश्वासन दिले होते. पण, निकालानंतरच्या राजकीय घडामोडीनंतर महाराष्ट्रात भाजपचे सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. त्यामुळं भाजपच्या आश्वासनाचे काय होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सावकर यांचे नातू रंणजीत यांनी शुक्रवारी दावा केला होता की, इंदिरा गांधीदेखील सावरकरांच्या समर्थक होत्या. याबाबत नवभारत टाईम्सने वृत्त प्रसिद्ध केले आहे. 'इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पाडले हे नेहरू आणि गांधी यांच्या विचारांच्या विरुद्ध होते, असे रणजीत यांनी म्हटल्याचे नवभारत टाईम्सने प्रसिद्ध केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Centre on Bharat Ratna to Veer Savarkar says no recommendation required