esakal | कोविड योद्धांना सरकारी नोकरीत प्राधान्य? केंद्राकडून महत्त्वाचे निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

corona

कोविड योद्धांना सरकारी नोकरीत प्राधान्य!

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- देशात कोरोना COVID-19 रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य सुविधा तोकड्या पडत आहेत. शिवाय आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. अशात केंद्र सरकारकडून काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांना Final Year MBBS students टेली-कन्सलटेशन आणि सौम्य लक्षणं असलेल्या कोरोना रुग्णांच्या देखरेखीवर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसेच B.Sc./GNM उत्तीर्ण असलेल्या नर्सला कोविड नर्सिग ड्यूटीवर लावण्यात येण्यार आहे. त्या सर्व वरिष्ठ डॉक्टर आणि नर्सच्या देखरेखेखाली काम करतील.

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. त्यातील एक म्हणजे NEET-PG परीक्षा चार महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच मेडिकल कर्चमारी ज्याने 100 दिवस कोविड ड्यूटीसाठी दिले आहेत. त्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. मेडिकल इन्टर्नंना कोविड मॅनेडमेंट ड्यूटीवर लावण्यात येणार आहे. मेडिकल कर्मचारी ज्यांनी 100 दिवस कोविड ड्यूटी केली आहे, त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी कोविड राष्ट्रीय सेवा सन्मान देण्यात येणार असल्याचं केंद्र सरकारने जाहीर केलंय. अधिक मोठ्या संख्येने मेडिकल कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी पुढे यावे यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचललं आहे.

हेही वाचा: कोरोना लसीच्या तुटवड्यामुळे ना ज्येष्ठांचे लसीकरण, ना तरुणांचे; दीडशे केंद्रे बंद

भारतात कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरत असल्याचं काहीसं चित्र दिसत आहे. मागील दोन दिवसांपासून दररोज आढळणाऱ्या नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत थोड्या प्रमाणात घट दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी दररोज वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या 4 लाखांच्या पुढे गेली होती. मात्र, तेथून कोरोना वाढीचा वेग मंदावल्याचं चित्र आहे. सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासांत तीन लाख 68 हजार 147 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर तीन हजार 417 जणांचा मृत्यू झालाय. याच कालावधीत तीन लाख 732 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

loading image