esakal | कोरोना लसीच्या तुटवड्यामुळे ना ज्येष्ठांचे लसीकरण, ना तरुणांचे; दीडशे केंद्रे बंद
sakal

बोलून बातमी शोधा

लसीकरण

कोरोना लसीच्या तुटवड्यामुळे ना ज्येष्ठांचे लसीकरण, ना तरुणांचे; दीडशे केंद्रे बंद

sakal_logo
By
हरी तुगावकर : सकाळ वृत्तसेवा

लातूर : राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील सर्वच नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा गाजावाजा करण्यात आला. पण, लसीचा पुरेसा पुरवठा झालेला नाही. केवळ साडेसात हजार लस आल्याने पहिल्या दिवशी या वयोगटासाठी फक्त पाचच केंद्र सुरु करण्यात आली आहेत. दीडशे पेक्षा जास्त लसीकरण केंद्र बंदच ठेवावी लागली आहेत. लसीच्या तुटवड्यामुळे ना ज्येष्ठांचे लसीकरण होत आहे ना तरुणांचे अशी परिस्थिती जिल्ह्यात आहे. राज्य शासनाच्या वतीने कोविड १९ प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी मोफत कोविड १९ लसीकरण मोहिमेला सुरवात झाली.

हेही वाचा: घरी जाताना गरोदर महिलेचा वेदनादायी मृत्यू, वीज अंगावर कोसळून शेवट

येथे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील लसीकरण केंद्रावर पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. उद्‍घाटनानंतर अवघ्या काही तासांच या केंद्रावरील लसदेखील संपली. लसीकरणाच्या मुहूर्तावर खासगी केंद्रांना लस देवू नये असे आदेश शासनाने आरोग्य विभागाला दिले आहेत. बाजारपेठेतून लस घेऊन ही केंद्र सुरू, करावेत असेही आदेश शासनाचे आहेत. सध्या बाजारपेठेत लस उपलब्ध नाही. शासन लस देत नाही, त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे १९ खासगी लसीकरण केंद्राचे शटरडाऊन झाले आहे. एकूणच लसीचा तुटवड्याचा मोठा परिणाम दिसत आहे.

हेही वाचा: मराठवाड्यात कोरोना रुग्णसंख्येत काहीशी घट, ६ हजार ३१५ नवे बाधित

साडेसात हजार लस अन् पाच केंद्र

राज्य शासनाच्या वतीने ही लस देण्यात येत आहे. यात जिल्ह्यातील १८ ते ४५ वयोगटातील नागरीकांसाठी फक्त साडेसात हजार लस देण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासन येथील विलासराव देशमुख शासकिय वैद्यकीय महाविद्यालय, उदगीर येथील सामान्य रुग्णालय, निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालय, औसा येथील ग्रामिण रुग्णालय, व अहदमपूर येथील ग्रामीण रुग्णालय या पाच ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करू शकले आहे. जिल्ह्यात दहा तालुके आहेत. पाच तालुक्यात तर एकही केंद्र सुरू होऊ शकलेले नाही.

नोंदणी लाखात, अपॉईंटमेन्ट शेकड्यात

राज्य शासनाच्या वतीने १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना ता. एक मेपासून लस देण्यात येत आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणी गरजेची आहे. या वयोगटात तरुण मोठ्या संख्येने आहेत. टेक्नोसाई आहेत. त्यामुळे लाखो जणांनी नोंदणी केली आहे. पण, जिल्ह्यात केवळ पाच केंद्रावर दररोज प्रत्येकी केवळ दोनशे जणांना अपाईंटमेन्ट घेऊन लसीकरण करण्यात येत आहे.

केंद्रावर नागरिकांचे हेलपाटे

जिल्ह्यात १७१ लसीकरण केंद्र आहेत. तेथे ४५ वर्षांवरील नागरिकांना केंद्र शासनाच्या वतीने लस देण्यात येत आहे. यापैकी केवळ पंधराच लसीकरण केंद्र सुरू आहेत. दीडशे पेक्षा जास्त केंद्र बंदच आहेत. त्यामुळे या वयोगटातील नागरिकांनाही लस मिळत नाही. दुसरा डोस घेणारे नागरीकही केंद्रावर हेलपाटे घालत आहेत.

loading image
go to top