esakal | प्रियांका गांधी यांचा सरकारी बंगला भाजप आयटी सेल प्रमुखाला मिळणार
sakal

बोलून बातमी शोधा

 Priyanka Gandhi, Lodhi Estate government bungalow, BJP MP, Anil Baluni

प्रियांका गांधी तब्बल 23 वर्षांपासून वास्तव्यास असलेला हा बंगला भाजपचे राज्यसभा खासदार आणि मीडिया सेल प्रमुख अनिल बलूनी यांना देण्यात येणार असल्याचे समजते.

प्रियांका गांधी यांचा सरकारी बंगला भाजप आयटी सेल प्रमुखाला मिळणार

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना लोधी इस्टेटमधील सरकारी बंगला रिकामा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्र सरकारनं यासंदर्भात एक पत्र प्रियांका गांधी यांना लिहिले आहे. 1 ऑगस्टपर्यंत त्यांना हा सरकारी बंगला रिकामा करावा लागणार आहे. 23 वर्षांपूर्वी म्हणजे 21 फेब्रुवारी 1997 रोजी प्रियांका गांधी यांना लोधी इस्टेटमधील हा बंगला देण्यात आला होता. यापूर्वी केंद्र सरकारने त्यांची  एसपीजी सुरक्षा हटवण्याचा निर्णय घेतला होता. ज्या व्यक्तीकडे एसपीजी सुरक्षा आहे त्यांनाच हा बंगला देण्यात येतो. या नियमाच्या आधारेच प्रियांका गांधी यांना हा बंगला रिकामा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  

मोठी बातमी! पंतप्रधानांच्या लेह भेटीनंतर उठलेल्या 'या' अफवांवर लष्कराचे स्पष्टिकरण; वाचा महत्वाची बातमी..

प्रियांका गांधी तब्बल 23 वर्षांपासून वास्तव्यास असलेला हा बंगला भाजपचे राज्यसभा खासदार आणि मीडिया सेल प्रमुख अनिल बलूनी यांना देण्यात येणार असल्याचे समजते. मागील वर्षाच्या नोव्हेंबरमध्ये  माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची एसपीजी सुरक्षा हटवण्यात आली होती. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 21 मे 1991मध्ये हत्या झाली होती. त्यानंतर गांधी कुटुंबियांना एसपीजी सुरक्षा देण्यात आली होती. सध्याच्या परिस्थितीत गांधी कुटुंबियांना या सुरक्षेची आवश्यकता नाही, या अहवालाचा दाखला देत केंद्र सरकारने त्यांची  एसपीजी सुरक्षा हटवण्याचा निर्णय घेतला होता.  

हेही वाचा: भारतात तयार होणाऱ्या कोरोनावरील लसीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणालेत की....

6-बी हाउस नंबर- 35 लोधी इस्टेटमधील बंगल्यात प्रियांका गांधी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होत्या. दोन दशकाहून अधिककाळ वास्तव्यास असलेला बंगला सोडण्यासाठी त्यांनी मनाची तयारी केल्याचे समजते. हा बंगला रिकामा करुन त्या लखनऊला शिफ्ट होणार असल्याचेही बोलले जात आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मामी शीला कौल यांचे लखनऊमधील घर 'कौल हाउस' याठिकाणी प्रियांका शिफ्ट होणार असल्याची चर्चा आहे.