esakal | मोठी बातमी! पंतप्रधानांच्या लेह भेटीनंतर उठलेल्या 'या' अफवांवर लष्कराचे स्पष्टिकरण; वाचा महत्वाची बातमी.. 
sakal

बोलून बातमी शोधा

pm narendra modi

लेह- लद्दाख भेटीदरम्यान पंतप्रधानांनी लेहच्या सामान्य रुग्णालयाला भेट दिली होती. या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी गलवान खोऱ्यात जखमी झालेल्या भारतीय सैनिकांची विचारपूस केली होती.

मोठी बातमी! पंतप्रधानांच्या लेह भेटीनंतर उठलेल्या 'या' अफवांवर लष्कराचे स्पष्टिकरण; वाचा महत्वाची बातमी.. 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: लेह- लद्दाख भेटीदरम्यान पंतप्रधानांनी लेहच्या सामान्य रुग्णालयाला भेट दिली होती. या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी गलवान खोऱ्यात जखमी झालेल्या भारतीय सैनिकांची विचारपूस केली होती. मात्र जखमी सैनिकांवर उपचार सुरु असलेल्या वार्डासंदरर्भात सोशल माध्यमांवरुन अनेक अफवा पसरल्या होत्या. 

या अफवांवर स्पष्टीकऱण देण्यासाठी लष्कर पुढ आलं आहे. कोविड संसर्गामुळे लेहच्या  सामान्य रुग्णालयातील प्रशिक्षण हॉलचे रुपांतर स्पेशल वार्डमध्ये करण्यात आले असून  या ठिकाणी जखमी सैनिकांवर उपचार सुरु असल्याचे लष्कराने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: आणखी किती संकटांना तोंड द्यायचं मुंबईकरांनी? 'या' गैरसोयीसाठीही राहावं लागणार तयार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  3 जुलैला लेहच्या सामान्य रुग्णालयाला भेट देऊन जखमी जवानांची चौकशी केली. मात्र या जवानांवर उपचार सुरु असलेल्या जागेबद्दल भ्रामक आणि खोडसाळ प्रश्न उपस्थित करण्यात आले. आपल्या शूर जवानांवरील उपचाराच्या स्तरावरही काही जणांनी आक्षेप घेतले. मात्र आपल्या जवानांना सर्वोत्तम उपचार देण्याचा प्रयत्न लष्कराचा असतो. अस या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. 

जवानांवर उपचार सुरु असलेल्या  100 खाटांचा हा वार्ड हा सामान्य रुग्णालयाचाच एक भाग आहे.  या रुग्णालयात कोव्हिड रुग्णांवर उपचार होते. त्यामुळे कोविड 19 च्या नियमावलीनूसार रुग्णालयातील काही वार्डांचे रुपांतर विलगिकरण केंद्रात करण्यात आले आहे. प्रशिक्षण सभागृहालाही तात्पुरत्या वार्डात रुपांतरीत करण्यात आले आहे. यापुर्वी या हॉलचा वापर ऑडिओ, व्हिडीओ प्रशिक्षणासाठी केला जायचा, असही लष्कराने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: भारतात तयार होणाऱ्या कोरोनावरील लसीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणालेत की....

गलवान खोऱ्यातील संघर्षात जखमी झालेल्या आपल्या सैनिकांना इतर कोव्हिड बाधितांपासून दूर ठेवण्यासाठी या तात्पुरत्या वार्डात  ठेवण्यात आले आहे. लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे आणि लष्कर कमांडर यांनीही या वार्डाला भेट दिल्याची माहिती या प्रसिध्दी पत्रकात देण्यात आली आहे.

army gives explanation about these rumors read full story

loading image