Security : नवनियुक्त CDS अनिल चौहान यांना मिळणार दिल्ली पोलिसांची 'Z' सुरक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cds general anil chauhan

Security : नवनियुक्त CDS अनिल चौहान यांना मिळणार दिल्ली पोलिसांची 'Z' सुरक्षा

CDS Anil Chauhan News : नवनिर्वाचित चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांना दिल्ली पोलिसांची झेड श्रेणीचे सशस्त्र सुरक्षा कवच देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनंतर गृह मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

जनरल बिपिन रावत यांच्या निधनानंतर नऊ महिन्यांनंतर सरकारने 28 सप्टेंबर रोजी लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) यांची नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून नियुक्ती केली. जनरल बिपिन रावत यांच्या निधनानंतर सीडीएसचे लष्करी पद रिक्त झाले होते.लेफ्टनंट जनरल चौहान हे मे 2021 मध्ये ईस्टर्न कमांडचे प्रमुख म्हणून निवृत्त झाले असून, त्यांना जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील दहशतवादाविरोधी कारवायांचा मोठा अनुभव आहे.

हेही वाचा: School Rules : लघुशंकेसाठीही निर्बंध; शाळांमधील अजब नियम एकदा वाचाच

कोण आहेत लेफ्टनंट जनरल अनिल चौहान?

लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांचा जन्म 18 मे 1961 रोजी झाला. ते राष्ट्रीय संरक्षण अकादमी, खडकवासला आणि इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडूनचे माजी विद्यार्थी आहेत. 1981 मध्ये भारतीय लष्कराच्या 11 गोरखा रायफल्समध्ये त्यांची नियुक्ती झाली. लेफ्टनंट जनरल चौहान यांनी 1981 ते 2021 या काळात लष्करात महत्त्वाच्या पदांवर काम केलं. 40 वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर ते 31 मे 2021 रोजी लष्कराच्या पूर्व कमांडच्या प्रमुख (जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ) या पदावरून निवृत्त झाले.

पूर्व कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून लेफ्टनंट जनरल चौहान यांच्या कार्यकाळात ईशान्येकडील भागात दहशतवादात मोठी घट झाली होती. लेफ्टनंट जनरल चौहान यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी उत्तम युद्ध सेवा पदक, परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले आहेत.

टॅग्स :SecurityCDS