'संसदीय कामकाज चालविणे ही केंद्राची जबाबदारी'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

पाटना (बिहार) : संसदीय कामकाज सुरळितपणे चालविणे हे केंद्र सरकारची जबाबदारी असल्याच्या प्रतिक्रिया संयुक्त जनता दलाने व्यक्त केल्या आहे.

पाटना (बिहार) : संसदीय कामकाज सुरळितपणे चालविणे हे केंद्र सरकारची जबाबदारी असल्याच्या प्रतिक्रिया संयुक्त जनता दलाने व्यक्त केल्या आहे.

यंदाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष वारंवार कामकाज बंद पाडत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नाराजी व्यक्त करत "संसदेचे कामकाज रोखून धरणे म्हणजे बहुमताचा आवाज दडपून टाकण्यासारखे आहे. त्यामुळे कृपा करून तुमचे अपेक्षित काम करा' अशी कडक समज त्यांनी दिली. या पार्श्‍वभूमीवर वृत्तसंस्थेशी बोलताना संयुक्त जनता दलाचे प्रवक्ते अजय आलोक यांनी, 'आम्ही राष्ट्रपतींच्या वक्तव्यावर संपूर्ण पाठिंबा देत आहोत. संसदेचे कामकाज न होणे हे दुर्दैवी आहे. मात्र दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरळितपणे पार पाडणे ही सत्तधाऱ्यांची जबाबदारी आहे. सरकारने कधीतरी चर्चेची प्रक्रिया सुरू करायला हवी. मात्र ती सुरु केली जात नाही. त्यामुळेच आम्ही या प्रकाराला दुर्दैवी म्हणत आहोत.' अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

'सशक्त लोकशाहीसाठी निवडणूक प्रक्रियेत सुधारणा' या विषयावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी शुक्रवारी बोलत होते. यावेळी त्यांनी खासदारांना काही आवाहनही केले. 'निदर्शने करण्यासाठी तुम्ही इतर जागा निवडा. संसदेमध्यये मात्र कृपा करून तुमचे काम करा. तुम्ही कामकाज पुढे चालविणे अपेक्षित आहे. तुम्हाला लोककल्याणासाठी दिलेल्या अधिकारांचा योग्य वापर करणे तुमच्याकडून अपेक्षित आहे', असे मुखर्जी म्हणाले.

Web Title: Centre responsible to ensure smotth functioning of Parliament: JD (U)