सोशल मीडिया केंद्र सरकारच्या हातात जाणार; नियमांमध्ये मोठे बदल

या प्रकरणातला मसुदा तयार आहे. त्यानुसार कायद्यात बदल होणार आहेत.
Social Media
Social Mediasakal

केंद्र सरकार आणि सोशल मीडिया कंपन्या यांच्यात आता नवा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने सोशल मीडिया वापरासंदर्भातले नियम आता आणखी कडक केले आहेत. एक समिती सोशल मीडियावरच्या कन्टेन्टवर नजर ठेवून असणार आहे. या प्रकरणाचा मसुदाही सादर करण्यात आला आहे. (Center seeks powers to override social media)

केंद्र सरकारने (Central Government) सोशल मीडिया कंपन्यांचा ताबा आता स्वतःकडे घ्यायचा विचार केला आहे. ज्यामुळे विविध प्रकारचे नियम मोडल्याप्रकरणी अकाऊंट ब्लॉक करणं, अकाऊंट सस्पेंट करणं, काढून टाकणं या सगळ्या गोष्टी सरकारच्या अखत्यारित येणार आहेत.या प्रकरणी मसुदा सादर करत प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया साईट्सवरच्या कन्टेन्टवर नजर ठेवण्यासाठी, योग्य ती कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारला अधिकार मिळणार आहेत.

केंद्र सरकार एक किंवा अधिक समित्या स्थापन करून हे नियंत्रण ठेवू शकणार आहे. या बदलाचा मसुदा आधी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आला होता. मात्र तो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्यानंतर मंत्रालयाने हा मसुदा वेबसाईटवरून हटवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com