ईशान्येतील Article 371 ला हात लावणार नाही : अमित शहा

पीटीआय
रविवार, 8 सप्टेंबर 2019

- राज्यघटनेतील 370 वे कलम हे तात्पुरतेच होते; पण 371 वे कलम मात्र ईशान्येसाठीची विशेष तरतूद आहे. या दोन्ही कलमांमध्ये खूप फरक.

गुवाहाटी : राज्यघटनेतील 370 वे कलम हे तात्पुरतेच होते; पण 371 वे कलम मात्र ईशान्येसाठीची विशेष तरतूद आहे. या दोन्ही कलमांमध्ये खूप फरक आहे. ईशान्येसाठीच्या या विशेष कलमाला आमचे सरकार कधीच हात लावणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केले. ते येथे ईशान्येकडील राज्याच्या परिषदेत बोलत होते. 

"केंद्र सरकारने जम्मू-काश्‍मीरमधील 370 वे कलम संपुष्टात आणल्यानंतर काही लोकांनी आता 371 व्या कलमावरून ईशान्य भारतामध्ये चुकीचा प्रचार करायला सुरवात केली आहे. केंद्र सरकार हे कलमदेखील संपुष्टात आणेल, असे लोकांना सांगितले जात आहे, या संदर्भात मी आधीच संसदेत स्पष्टीकरण दिले असून, आताही मी ईशान्य भारतातील काही बड्या मंत्र्यांच्या उपस्थितीत या बाबीचा पुनरुच्चार करतो आहे. सरकार या कलमाला कधीच धक्का लावणार नाही,'' असे शहा यांनी स्पष्ट केले.

मोदी सरकारमधील मंत्रीच म्हणतात, जीएसटी, नोटाबंदीमुळे आर्थिक मंदी

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पुस्तिकेबाबत (एनआरसी) लोकांच्या मनात अनेक प्रकारच्या शंकाकुशंका आहेत. एकाही घुसखोराला आमचे सरकार देशामध्ये राहू देणार नाही, हाच आमचा निर्धार आहे. आताही "एनआरसी' यादीच्या निर्मितीची प्रक्रिया कालबद्धरीतीने पूर्ण करण्यात आली होती, असे शहा यांनी नमूद केले. 

पाकमधून 200 दहशतवादी काश्मीरमध्ये घुसण्याच्या तयारीत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Centre will not touch Article 371 says Amit Shah