मोदी सरकारमधील मंत्रीच म्हणतात, 'जीएसटी, नोटाबंदीमुळे आर्थिक मंदी'

वृत्तसंस्था
Sunday, 8 September 2019

- 'गाय' व 'राम' हा राजकारणाचा नव्हे तर राष्ट्रीय गौरवाचा मुद्दा असून, गायीला विशिष्ट धर्माशी जोडू नये

इछावर (मध्य प्रदेश) : देशातील मंदीला जीएसटी व नोटाबंदीच कारणीभूत असल्याची कबुली आज केंद्रीय पशुसंवर्धन राज्यमंत्री प्रतापचंद सारंगी यांनी दिली. या बिकट परिस्थितीतून देश लवकरच सावरेल, अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

सिहोर जिल्ह्यातील इछावरमध्ये असलेल्या खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या कार्यालयास त्यांनी शनिवारी भेट दिली. याप्रसंगी ते बोलत होते. सारंगी म्हणाले, ''या मंदीचा उद्योग व्यवसायांवर फारसा परिणाम होणार नाही. कंपन्यांतील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या शाबूत राहतील. सरकार या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्नशील आहे.''

दुसऱ्या अकाऊंटला पैसे ट्रान्सफर झाले? तर आता घाबरू नका...

तसेच 'गाय' व 'राम' हा राजकारणाचा नव्हे तर राष्ट्रीय गौरवाचा मुद्दा असून, गायीला विशिष्ट धर्माशी जोडू नये, असे आवाहन करतानाच मध्य प्रदेश सरकारला एक हजार गोशाळांच्या निर्मितीसाठी सहकार्य करु, असे आश्वासनही त्यांनी दिले.

बारामती जिंकणे हा भाजपच्या दृष्टीने हवेतला दावा : चंद्रकांत पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Economy Is Slow Because Of Gst And Demonetisation says Pratap Chandra Sarangi