कोरोनाची नवी लक्षणं आढळल्याने केंद्राच्या ८ राज्यांना विशेष सुचना

देशातील अनेक राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या वेगानं वाढू लागली आहे.
Rajesh Bhushan
Rajesh BhushanTeam eSakal
Updated on

कोरोना (Covid19) महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पहिल्या लाटेत आरोग्य व्यवस्थेतेतील कमतरतांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर आता कोरोनाच्या तुलनेत ओमिक्रॉन (Omicron) हा नवा व्हेरीअंट वेगानं पसरणारा असल्याचं तज्ञांकडून सांगण्यात आलंय. त्यानंतर आता केंद्र सरकारने (Central Government of India) राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून सुचना दिल्या आहेत.

Rajesh Bhushan
Vaishno Devi Stampede : 12 जणांच्या मृत्यूनंतर मोदींकडून मदतीची घोषणा

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांच्याकडून पाठवल्या गेलेल्या पत्रात त्यांनी या संदर्भातील सुचना दिल्या आहेत. अनेक राज्यांत ओमिक्रॉनच्या संसर्गासह कोरोनाच्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या पत्रातून सरकारला विविध ठिकाणी कोरोनाटी चाचणी करण्यासाठी २४ तास बूथ उभारणे, या बुथवर रॅपीड अँटीजन टेस्टची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सुचना केल्या आहेत. तसेच रुग्णांना स्वदेशी बनावटीच्या कीट वापरण्याचा सल्ला दिला आहे.

Rajesh Bhushan
Omicron | 31st नंतर देशात कोरोनाचा उद्रेक, महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

कोरोनाच्या रुग्णांमध्ये झालेल्या वाढीनंतर तातडीने या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सुचना केंद्राने राज्या सरकारला दिल्या आहेत. मृत्यूचा आकडा वाढू नये यासाठी काळजी घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. दिल्ली, महाराष्ट्र, हरियाणा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, गुजरात, झारखंड आणि कर्नाटक या राज्यांचा यामध्ये समावेश आहे. भूषण यांनी ताप, खोकला, डोकेदुखी, घसा खवखवणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अंग दुखणे, वास न येणे, चव न लागणे, जुलाब होणे आणि थकवा येणे ही सर्व कोरोनाची लक्षणं असल्याचं सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com