Article 370 निर्णयाविरोधात जेएनयूची 'ही' विद्यार्थिनी देणार आव्हान

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

या प्रकरणात कायदेशीर लढाई लढण्याचा मार्ग आम्ही पत्करणार आहोत. संविधानिक आणि कायदेशीरदृष्ट्या आमची बाजू भक्कम असून सर्वोच्च न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल, अशी आम्हाला आशा आहे, असे शेहलाने म्हटले आहे.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मिरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे संपूर्ण देशभरातून मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे. मात्र दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची (जेएनयू)ची माजी विद्यार्थिनी आणि सामाजिक कार्यकर्त्या शेहला रशीद सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. तसे ट्विटही त्यांनी केले आहे.

दरम्यान, शेहला यांनी एकापाठोपाठ एक असे दहा ट्विट करून जम्मू-काश्मीरच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड कराशेहला रशीद हिने ट्विट करत सरकारचा निर्णय म्हणजे संविधानाचा विश्वासघात केल्यासारखे आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाला मी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. त्यासाठी मी काही कार्यकर्ते आणि वकिलांच्या टीमच्या संपर्कात आहे.

या प्रकरणात कायदेशीर लढाई लढण्याचा मार्ग आम्ही पत्करणार आहोत. संविधानिक आणि कायदेशीरदृष्ट्या आमची बाजू भक्कम असून सर्वोच्च न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल, अशी आम्हाला आशा आहे, असे शेहलाने म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Centres move undemocratic unacceptable and unfortunate says Shehla Rashid on article 370