27-28 जुलैला दिसणार शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहण

वृत्तसंस्था
शनिवार, 14 जुलै 2018

27 आणि 28 जुलै रोजी रात्री या शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहण दिसणार आहे. या चंद्रग्रहणाचा कालावधी तब्बल 1 तास 43 मिनीटे असणार आहे. अशा प्रकारची माहिती पृथ्वीविज्ञान मंत्रालयाने काल (शुक्रवारी) दिली आहे.

नवी दिल्ली-  27 आणि 28 जुलै रोजी रात्री या शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहण दिसणार आहे. या चंद्रग्रहणाचा कालावधी तब्बल 1 तास 43 मिनीटे असणार आहे. अशा प्रकारची माहिती पृथ्वीविज्ञान मंत्रालयाने काल (शुक्रवारी) दिली आहे. 

हे चंद्रग्रहण भारतीय वेळेनुसार 27 जुलै रोजी रात्री 11 वाजून 54 मिनीटांनी सुरु होणार आहे. यावेळी आंशिकरित्या चंद्र हळूहळू पृथ्वीच्या सावलीने झाकून जायला सुरवात होईल आणि तो संपूर्णतः 28 जुलैला साधारणतः 1 वाजता झाकला जाईल. त्यानंतर तो 2 वाजून 43 मिनिटापर्यंत झाकलेला राहील. त्यानंतर तो आंशिकरित्या बाहेर यायला सुरवात होईल आणि 28 जुलै रोजी सकाळी 3 वाजून 49 मिनिटांनी हे चंद्रग्रहण पूर्णतः संपलेले असेल.

दरम्यान, हे या शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहण असणार आहे. तब्बल 1 तास आणि 43 मिनीटे यावेळी चंद्र पृथ्वीच्या सावलीने झाकोळलेला असेल.

Web Title: Century's Longest Lunar Eclipse To Take Place On July 27-28