बंगळूरूः बंगळूरु येथील अमृताहल्ली येथील एरोनिक्स मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या टेक कंपनीमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. एका माजी कर्मचाऱ्याने कंपनीचे एमडी आणि सीईओची हत्या केल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी चार वाजता कंपनीचा माजी कर्मचारी फेलिक्स कार्यालयात दाखल झाला. त्याने कंपनीचे एमडी पी. सुब्रह्मण्य आणि सीईओ वीनू कुमार यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यानंतर तो तिथून फरार झाला.
एमडी आणि सीईओ यांना कंपनीतील लोक रुग्णालयात नेत होतं परंतु रस्त्यामध्येच दोन्ही अधिकाऱ्यांनी जीव सोडला. आरोपी फेलिक्स हा फरार आहे. आम्ही लवकरच आरोपींना ताब्यात घेऊ, असं पोलिस सांगत आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.