
प्रियकराचे कर्ज फेडण्यासाठी अभियंता प्रेयसी करायची चेन स्नॅचिंग
तामिळनाडूच्या कालियाम्मल भागात दुचाकीवरून आलेल्या दोन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी वृद्ध महिलेला लुटले. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. दुचाकीच्या नोंदणी क्रमांकाच्या मदतीने दोघांचा शोध घेऊन अटक करण्यात आली आहे. प्रसाद आणि तेजस्विनी अशी आरोपींची नावे आहेत. ते प्रियकर आहेत.
कालियाम्मल परिसरात महिला रस्त्यावर शेळ्या चरत असताना दोन दुचाकीस्वार तिच्याजवळ थांबले. दोघांनी महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाणा करून संधीचा फायदा घेत वृद्ध महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावून पलायन केले. महिलेने तत्काळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दोन आरोपींनी तिची ४४ ग्रॅम सोन्याची चेन (Chain snatching) हिसकावून पळ काढल्याचे पोलिसांना सांगितले.
हेही वाचा: मॅट्रिमोनिअल साइटवरून मैत्री नंतर शारीरिक संबंध अन्...
यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले. ज्याद्वारे आरोपींची ओळख पटली. वाहनाच्या नोंदणी क्रमांकावरून आरोपींचा शोध घेण्यात आला आणि पोलिसांनी प्रसाद आणि तेजस्विनी यांना अटक (thief) केली. दोघेही सोमय्यापालयम येथील खासगी महाविद्यालयात बीटेक तृतीय वर्षाचे विद्यार्थी आहेत.
दोन्ही आरोपी गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघेही चांगल्या घरचे आहे. मात्र, प्रसादला ऑनलाइन जुगाराचे व्यसन असल्याने कर्ज घेतले होते. ते फेडण्यासाठी दोघांनी चेन स्नॅचिंगसारख्या (Chain snatching) घटना घडवून आणण्यास सुरुवात केली. आरोपी प्रसादच्या कुटुंबीयांनीही एकदा पोलिस ठाण्यात घरातून २५० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र, ही चोरी मुलाने केल्याचे समजताच त्यांनी केस मागे घेतली, असे पोलिसांनी सांगितले.
Web Title: Chain Snatching Thief Crime News Tamilnadu
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..