मॅट्रिमोनिअल साइटवरून मैत्री नंतर शारीरिक संबंध अन्... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

atyachar

मॅट्रिमोनिअल साइटवरून मैत्री नंतर शारीरिक संबंध अन्...

डिजिटल युगात मोठ्या संख्येने युवक मित्र बनवण्यासाठी किंवा जीवनसाथी निवडण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेतात. परंतु, सोशल मीडियावरील ही ओळख कधी कधी धोकादायकही ठरते. असाच काहीसा प्रकार भोपाळमध्ये राहणाऱ्या २४ वर्षीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीसोबत घडला. मॅट्रिमोनिअल साइटवर ओळख झाल्यानंतर युवक भोपाळमधील हॉटेलमध्ये आला आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीसोबत शारीरिक संबंध ठेवले. तिच्या विश्वास जिंकल्यानंतर २३,००० रुपये घेऊन फरार (Cheating) झाला. याप्रकरणी पोलिस आरोपीचा शोध घेत आहे.

विद्यार्थिनी दुसऱ्या शहरातील आहे. ती भोपाळमध्ये राहून अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. तिने लाइफ पार्टनरच्या शोधात प्रोफाईल मॅट्रिमोनियल साइटवर टाकले होते. काही दिवसांनी तरुणाने तिच्याशी संपर्क साधला. त्याने आपले नाव संदीप भट्ट (रा. दिल्ली) असे सांगितले. मॅट्रिमोनिअल साइटवरील (Matrimonial site) ओळख कॉलिंग आणि चॅटिंगपर्यंत (Love) पोहोचली. दोघांनी एकमेकांना भेटायला ठरवले. भोपाळच्या हॉटेलमध्ये भेटायचे ठरले, असे टीआय सुधीर अरजारिया यांनी सांगितले.

हेही वाचा: वीज संकट : अमित शहांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

हॉटेलमध्ये झालेल्या भेटीदरम्यान तरुणी आणि संदीपमध्ये शारीरिक संबंधही निर्माण झाले. यानंतर संदीप परत गेला. मात्र, काही दिवसांनी तो पुन्हा भोपाळला आला तरुणीसोबत हॉटेलमध्ये २ ते ३ दिवस राहिला. यादरम्यान दोघांमध्ये पुन्हा एकदा शारीरिक संबंध निर्माण झाले. तोपर्यंत संदीपने तरुणीचा विश्वास जिंकला होता.

याच विश्वासाचा फायदा घेत कर्जाच्या नावाखाली तरुणीकडून २३ हजार रुपये उसने (Cheating) घेतले. अनेक दिवस उलटूनही संदीपचा फोन न आल्याने तरुणीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संदीपचा फोन बंद येत होता. अनेक दिवस प्रयत्न करूनही संदीपशी काही बोलले नाही. यामुळे तिला आपली फसवणूक झाल्याचे समजले. यानंतर तिने एमपीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३७६ आणि ४२० नुसार गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: MPSCचा मोठा निर्णय; युपीएससीच्या धर्तीवर होणार पूर्व परीक्षा

दुसऱ्याच्या नावावर रूम का बुक

आरोपीने हॉटेलमध्ये बुकिंग करण्यासाठी दिलेल्या आधारकार्डवर सुनील हे नाव लिहिलेले असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. त्यामुळे हॉटेलने दुसऱ्याच्या नावावर रूम का बुक केली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या पोलिसांनी आधार कार्डवर लिहिलेला पत्ता आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Web Title: Love Cheating Matrimonial Site Bhopal Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top