चॅलेंज! दबा धरून बसलेला सिंह शोधा बरं...

वृत्तसंस्था
Monday, 13 July 2020

सोशल मीडियावर एक छायाचित्र व्हायरल होत असून, त्यामध्ये शिकारीसाठी दबा धरून बसलेल्या सिंहाला अनेकजण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. छायाचित्र व्हायरल करताना अनेकजण चॅलेंज देत आहेत तर चॅलेंज स्विकारून काही जण सिंहाला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

नवी दिल्लीः सोशल मीडियावर एक छायाचित्र व्हायरल होत असून, त्यामध्ये शिकारीसाठी दबा धरून बसलेल्या सिंहाला अनेकजण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. छायाचित्र व्हायरल करताना अनेकजण चॅलेंज देत आहेत तर चॅलेंज स्विकारून काही जण सिंहाला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

न्यू मेक्सिको, न्यू मेक्सिकोमधील रिओ मोरा नॅशनल वाइल्डलाइफ रिफ्यूजने हे छायाचित्र व्हायरल केले आहे. या चित्रात हरीण गवत खाताना दिसत असून, हरणाची शिकार करण्यासाठी सिंह झाडांमाध्ये लपून बसला आहे. पण, सिंह अगदी सहज दिसत नाही.

नेटिझन्स सिंह शोधताना प्रतिक्रियाही नोंदवत दिसत आहेत. सिंह कुठे आहे हे समजत नाही. सिंहाला शोधायला खूप वेळा लागला. मला अगदी सहज सापडला, अशाही प्रतिक्रिया पाहायला मिळतात. पण, तुम्हाला जर सिंह दिसत नसेल तर चित्राच्या उजव्या बाजूला झाडाजवळ पाहा. खाली गवतात शिकार करण्यासाठी सिंह दबा धरून बसलेला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: challenge can you spot a mountain lion photo viral